इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!!!

 श्रीनिवास राऊत यांना पितृशोक ; बबनराव राऊत यांचे अपघाती निधन



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक नेते श्रीनिवास राऊत यांचे वडील बबनराव पिलोबा राऊत यांचे आज शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 53 वर्षे होते. उद्या शनिवारी सकाळी परळीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

    शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याचे सुमारास बबनराव राऊत हे एक लग्न आटोपून ऑटो रिक्षाने परळी वैजनाथकडे येत असताना निळा पाटीजवळ त्यांचा ऑटो अचानक पलटी झाला. यात बबनराव राऊत यांच्या छातीला जबर मार लागला. त्यांना प्रथम गंगाखेड येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून परळी वैजनाथ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. कै. बबनराव राऊत यांच्या पश्चात   पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. 

आज परळीत अंत्यसंस्कार

     कै. बबनराव राऊत यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता परळी वैजनाथ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. राऊत परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या