परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी गोपीनाथगडावर नतमस्तक
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी गोपीनाथगडावर नतमस्तक होऊन लोकनेत्याचे आशीर्वाद घेतले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज १२ डिसेंबर रोजी जयंती. त्यानिमित्त गोपीनाथगडावर राज्यभरातून मोठ्या संख्येने जनसमुदायाने दर्शनाला रिघ लावली.या अनुषंगाने परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी परळी नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासमवेत पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.धर्माधिकारी दाम्पत्य गोपीनाथगडावर नतमस्तक होऊन त्यांनी लोकनेत्याचे आशीर्वाद घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा