पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

दोन लाख सत्तेचाळीस हजाराचा माल हस्तगत.....

इमेज
परळीत बेकायदेशीर दारूसाठ्यावर छापा; दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ : प्रतिनिधी...       परळीच्या पोलीस ठाणे संभाजीनगर हद्दीत बेकायदेशीर दारू साठवणूक व विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मोठा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी  महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास परळी वैजनाथ येथील हॉटेल आबासाहेब समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी बेकायदेशीररीत्या विविध कंपन्यांची दारू साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप उत्तमराव चव्हाण यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली.या कारवाईत रॉयल स्टॅग, मॅकडॉल, ओल्ड बॉम्बे, इम्पेरियल ब्ल्यू, आयकॉनिक व्हाइट, आफ्टर डार्क ब्ल्यू, सखु संत्रा, टँगो पंच, रुस्तुम गोल्ड, मॅजिक मोमेंट्स आदी विविध कंपन्यांच्या दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे दोन  लाखांहून अधिक रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.      या प्रकरणी पोलीस ठाणे संभाजीनगर येथे ...

हार्दिक अभिनंदन..

इमेज
  प्रा. श्री व्ही. टी. गित्ते यांना गणित विषयात पीएच्. डी. प्रदान                परळी वैजनाथ : नागनाथआप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय परळी वैजनाथ येथील प्रा. व्यंकट तातेराव गित्ते यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर यांच्याकडून 12 डिसेंबर 2025 रोजी गणित या विषयात पीएच्. डी. प्रदान करण्यात आली आहे.                    श्री. गित्ते यांनी "CONVECTION AND MASS TRANSFER EFFECTS ON ROTATING FLOW AND GRAVITY MODULATION" या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून उत्तमचंद बगडिया महाविद्यालय, रिसोड येथील प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी सर होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक पाचपट्टे सर, प्रा. डॉ. रवींद्र लहुरीकर सर व गणित अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. जगदीश ननवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. बाह्य परीक्षक म्हणून पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठाचे गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश ता...

नांदेड महापालिका निवडणूक..

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांची नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रभारीपदी नियुक्ती  मुंबई।दिनांक १९। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे.    स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 नांदेड महानगरपालिका निवडणुकीकरिता आपली नियुक्ती करण्यात आल्याचे आज घोषित करण्यात आले. आपण आपल्या संघटन कौशल्याने भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे असं पत्रात नमूद करून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  ••••

निवडणूक प्रभागातील १५ मतदान केंद्रावर राहणार सीसीटीव्हीची नजर

इमेज
  परळी नगर परिषद निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार उर्वरित प्रभागातील जागासाठी आज मतदान  निवडणूक प्रभागातील १५ मतदान केंद्रावर राहणार सीसीटीव्हीची नजर आज होणाऱ्या मतदानासाठी प्रभागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा- निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-         राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उर्वरित नगर परिषदेच्या 3 प्रभागातील ४ नगर सेवकपदासाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. या जागासाठी शनिवार दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ४ जागेसाठी 14, 238 मतदार मतदान हक्क बजावणार आहेत. दुबार मतदान असणाऱ्याना करता येणार एकाच ठिकाणी मतदान व हमीपत्र सादर करावं लागणार आहे. तर दुबार मतदान केल्यास कारवाई होणार आहे. तर प्रभागातील मतदान केंद्रावर सिसिटीव्ही निगरानी राहणार आहे. तरी आज होणाऱ्या मतदानासाठी उर्वरित  प्रभागातील मतदार बांधवानी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिका...

आज सुट्टी जाहीर....

इमेज
  नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक सुट्टी जाहीर बीड : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदारांना निर्भय व सुलभरीत्या मतदान करता यावे , या उद्देशाने बीड जिल्ह्यातील संबंधित क्षेत्रांसाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे . महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि . १९ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार , ही सार्वजनिक सुटी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी निर्गमित केले आहेत . सदर आदेशानुसार राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने शनिवार दि . २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून , त्या दिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे . यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई , पाटोदा , परळी वैजनाथ , किल्लेधारूर आदी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे . या सार्वजनिक सुटीचा लाभ संबंधित मतदारसंघातील सर्व मतदारांना मिळणार असून , मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्...

रामरक्षा गोशाळेने गो सेवेत आदर्श निर्माण निर्माण केला: प्रशासनाकडून कौतुक !

इमेज
  रामरक्षा गोशाळेला पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव डॉ. एन. रामास्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट रामरक्षा गोशाळेचे गो संगोपनाचे काम अतिशय चांगले आणि कौतुकास्पद- पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव डाॅ. एन .रामास्वामी रामरक्षा गोशाळेने गो सेवेत आदर्श निर्माण निर्माण केला: प्रशासनाकडून कौतुक ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी..             पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात गोशाळा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या अनुषंगाने परळी वैजनाथ येथील रामरक्षा गोशाळेने गो संगोपनाचे अतिशय नीटनेटके आणि सर्व दृष्टीने चांगले संगोपन केले आहे. ही गोशाळा एक आदर्श गोशाळा असून हे काम कौतुकास्पद असल्याचे महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाचे सचिव डाॅ. एन. रामास्वामी यांनी गौरवोद्गार काढले.डाॅ. एन रामास्वामी यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामरक्षा गोशाळेला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणची व्यवस्था आणि गोसेवेचे आदर्श काम पाहून प्रशासनाकडून या गोशाळेचे कौतुक करण्यात आले.       परळी व परिसरामध्ये आपल्या गो सेवेतून एक आदर्श निर्माण ...

प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी....

इमेज
  नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ईदगाहच्या संरक्षणाची मागणी परळी / प्रतिनिधी  दि. 21 डिसेंबर 2025 रोजी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक गुलाल उधळत जल्लोष करत असतात. हा जल्लोष परळी शहर पोलीस ठाण्यासमोरील नेहरू चौक तळ परिसरातील ईदगाह परिसरातून जात असताना गुलाल अथवा इतर साहित्य ईदगाहवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊन शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.      यासंदर्भात तहसीलदार नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले असून, निवडणूक निकालाच्या दिवशी ईदगाहला तात्पुरत्या पडद्याने झाकण्यात यावे तसेच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करून संभाव्य अनुचित प्रकार टाळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात सलोखा, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, तसेच कोणताही अनुच...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!