कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
12 फेब्रुवारी रोजी सिटू कामगार संघटनेचा परळी तहसील_ कार्यालयावर भव्य मोर्चा- प्रा खाडे बी.जी. परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... कामगारांनी शंभर वर्षाच्या लढ्यातून कामगारांच्या हिताचे निर्माण केलेले कामगार कायदे मोदी सरकारने रद्द केले आहेत. कामगार विरोधी मालकधार्जिन्या चार श्रमसंहिता लागू केल्या आहेत. चार श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी देशातील सर्व कामगार संघटना 12 फेब्रुवारी रोजी संप करत आहेत. बीड जिल्ह्यात सिटू कामगार संघटना ही चार श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी 12 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ तहसीलवर मोर्चा काढून आंदोलन करणार आहे. या श्रमसंहितांमुळे कामगार अस्थिर होणार व तो कायमचा नोकरीला मुकणार आहे. कारखान्यातील सर्व नोकऱ्या तात्पुरत्या होणार आहेत. सर्व तरुण कामगारांचा विचार करता केंद्र सरकारचे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे सिटूचा श्रमसंहितेस विरोध आहे. सिटू अंतर्गत परळी तालुक्यातील बांधकाम कामगार संघटना, लालबावटा कामगार युनियन, आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण आहार संघटना, असंघटित कामगार संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. हा मोर्चा रोडे ...