#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

नराधमाचे कुकर्म: नातीच्या वयाच्या चिमुकलीवर अत्याचार

 नऊ वर्षीय बालिकेवर वयोवृद्धाचा अत्याचार 

दिंद्रुड: चॉकलेट देतो म्हणून एका वयोवृद्ध इसमाने नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना दि.२८ रोजी  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका वाडीत घडली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस तात्काळ जेरबंद करत बीड जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली.

        पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार,धारूर तालुक्यातील एका वाडीत एक शेतमजूर कुटुंब राहते, त्यांची इयत्ता चौथीत  शिकणारी नऊ वर्षीय मुलगी दि.28 रोजी सकाळी शाळेत जात असताना, मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली, रस्त्यातच आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावून घेतले. घराची कडी आतून लावून मुलीच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला, मुलगी ओरडत असताना ही तिची दया माया केली नाही, त्यानंतर मुलगी शाळेत गेली, घरी आल्यापासून ती शांत शांत राहत असल्याने दि.२९ रोजी आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेली सर्व आपबिती सांगितली. दरम्यान या किळसदायक घटनेत दिंद्रुड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस)२०२३ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत  अंबाजोगाई येथून फरार आरोपीस जेरबंद केले असून सेशन कोर्टात दाखल करत आरोपी बाबुराव निरडेची बीड जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती सपोनि महादेव ढाकणे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....