दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली....

 माऊली चिकणे यांना मातृशोक: पार्वतीबाई चिकणे यांचे निधन




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       येथील सर्वपरिचित वैद्यना गॅस एजन्सीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर (माऊली) चिकणे यांच्या मातोश्री पार्वतीबाई बाबुराव चिकणे यांचे आज (दि. 2 फेब्रुवारी) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 95 वर्षे वयाच्या होत्या.

         अतिशय मनमिळावू, कुटुंबवत्सल व चिकणे परिवाराच्या आधारवड म्हणून पार्वतीबाई चिकणे यांची ओळख होती. वयोमाना परत्वे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा  दोन मुली, सून ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत पार्वतीबाई बाबुराव चिकणे यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चिकणे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!