प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

12 फेब्रुवारी रोजी सिटू कामगार संघटनेचा परळी तहसील_ कार्यालयावर भव्य मोर्चा- प्रा खाडे बी.जी.




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     कामगारांनी शंभर वर्षाच्या लढ्यातून कामगारांच्या हिताचे निर्माण केलेले कामगार कायदे मोदी सरकारने रद्द केले आहेत. कामगार विरोधी मालकधार्जिन्या चार श्रमसंहिता लागू केल्या आहेत. चार श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी देशातील सर्व कामगार संघटना 12 फेब्रुवारी रोजी संप करत आहेत. बीड जिल्ह्यात सिटू कामगार संघटना ही चार श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी 12 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ तहसीलवर मोर्चा काढून आंदोलन करणार आहे.

         या श्रमसंहितांमुळे कामगार अस्थिर होणार व तो कायमचा नोकरीला मुकणार आहे. कारखान्यातील सर्व नोकऱ्या तात्पुरत्या होणार आहेत. सर्व तरुण कामगारांचा विचार करता केंद्र सरकारचे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे सिटूचा श्रमसंहितेस विरोध आहे. सिटू अंतर्गत परळी तालुक्यातील बांधकाम कामगार संघटना, लालबावटा कामगार युनियन, आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण आहार संघटना, असंघटित कामगार संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. हा मोर्चा रोडे चौकातील सिटू कार्यालयापासून दुपारी बारा वाजता निघून तहसीलवर पोहोचणार आहे. कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा, खाजगीकरण थांबवा, नगरपालिकेतील रोजंदारी कामगारांना कायम करा, कामगारांना आठ तासाच्या कामास मासिक वेतन तीस हजार रुपये द्या, सर्व ज्येष्ठांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन द्या, अशा अंगणवाडी कर्मचारी शालेय पोषण आहार कर्मचारी यांना कायम करा व किमान वेतन द्या, बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन द्या, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत चालू ठेवा, घरेलू कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या, घरेलू कामगारांना तात्काळ आश्वासनाप्रमाणे भांडे व सन्मान धन द्या  घरेलू कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या  आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

     या मोर्चात सिटू कार्यालयापासून सर्व कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिटूचे अध्यक्ष प्रा. खाडे बी.जी., किरण सावजी, जालिंदर गिरी, सुवर्णा रेवले, हेमा काळे, आशा लांडगे, प्रकाश वाघमारे, शेख जावेद, कुशावर्ता गांगर्डे, रेखा जाधव, यमुना पाथरकर, रमेश पांचाळ, हनुमंत रुपनर आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या