भरत गित्ते ब्रँड ॲम्बेसिडर ;तौरल इंडिया सुपा प्रकल्प: महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'तौरल इंडिया-सुपा प्लांट'चे भव्य उदघाटन अहिल्यानगर, प्रतिनिधी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पारनेर, अहिल्यानगर येथे 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक भरत गित्ते अभिनंदन व कौतुक करत भरत गित्ते हे महाराष्ट्राच्या नवउद्योग विश्वाचेब्रँड ॲम्बेसिडर ठरल्याचे सांगितले.तसेच तौरल इंडिया सुपा प्रकल्प सुरु होत आहे हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गित्ते यांनी सुरु केलेल्या पारनेर, अहिल्यानगर येथील 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण...