प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

भरत गित्ते ब्रँड ॲम्बेसिडर ;तौरल इंडिया सुपा प्रकल्प: महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'तौरल इंडिया-सुपा प्लांट'चे भव्य उदघाटन




 अहिल्यानगर, प्रतिनिधी...

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पारनेर, अहिल्यानगर येथे 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक भरत गित्ते अभिनंदन व कौतुक करत भरत गित्ते हे महाराष्ट्राच्या नवउद्योग विश्वाचेब्रँड ॲम्बेसिडर ठरल्याचे सांगितले.तसेच तौरल इंडिया सुपा प्रकल्प सुरु होत आहे हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव  असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले.

          तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गित्ते यांनी सुरु केलेल्या पारनेर, अहिल्यानगर येथील 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. भागवत कराड, तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते, ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  तौरल इंडिया-सुपा प्लांटच्या यंत्रसामग्रीची पाहणी करत माहिती घेतली. तसेच  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'तौरल इंडिया-सुपा प्रकल्प' च्या कोनशिलेचे आणि 'ॲल्युमिनियम मॅन' पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

         यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्र या प्रगतीला गती देत आहे. तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत आहे. तौरल इंडिया–सुपा प्लांट प्रकल्प हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव आहे.आपल्या सरकारने दावोसमधून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ₹50,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात ₹11,519 कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 18,000 रोजगार निर्माण होतील, तर उत्तर महाराष्ट्रात जवळपास 75,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, महाराष्ट्र शासन प्रत्येक उद्योजकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.


उद्योजक भरत गित्ते यांचे मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक.....

     यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक भरत घेतले यांचे भरभरून कौतुक केले भरत गीते यांनी आपल्या स्वकर्तृत्वातून व आपल्या ज्ञान आणि प्रयत्नातून अतिशय उत्तम अशा प्रकारचा उद्योग स्थापित केला आहे भगत गीते यांचा गतिशीलपणाने उद्योग उभारण्याचा आदर्श एक उदाहरण म्हणून नवउद्योजकांसाठी समोर आलेला आहे. त्यांच्या उद्योग क्षेत्रातील ज्ञान प्रयत्न व कर्तुत्वावर परदेशातील प्रसिद्ध युनिव्हर्सिटीत यांच्यावर एक स्टडी प्रकाशित करते असे उत्तुंग व्यक्तिमत्व भरत गीते यांचे असल्याचे गौरव उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. आमचे मित्र असा उल्लेख करत एक उद्योजक म्हणून स्वतःच्या भरोशावर उद्योग उभा केलेला आहे आणि कमी कालावधीत त्यांनी काम करून दाखवलं आहे त्याबद्दल त्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.भरत गित्ते हे महाराष्ट्रासाठी नव उद्योजकांना एक ब्रँड अँबेसिडर म्हणून परिचित झाले असल्याचा गौरव त्यांनी केला. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना अतिशय आनंद होतोय कारण हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव आहे असा आवर्जून उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या