पोस्ट्स

इमेज
  नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...

केज अंबाजोगाई रोडवर घटना

इमेज
मोटार सायकलला कारची धडक : मोटारसायकल वरील परळीचे दोन युवक जखमी केज :- केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या माऊली जिनिंग समोर एका मोटार सायकलीला भरधाव वेगातील कारने राँग साईडने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत.        दि. १९ मार्च रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास केज येथे सेंट्रिगचे काम करुन परळीकडे मोटार सायकल क्र. (एम एच-२३/ बी एल-५०५३) वरून परळी कडे जात होते. त्यावेळी त्यांना केज-अंबाजोगाई रोडवर केज येथील उपजिल्हा रुग्णालय जवळ असलेल्या माऊली जिनिंग जवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील बलेनो कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या कारने तिच्या समोरील एका वाहनाला ओहरटेक करीत असताना भरधाव वेगातील कार निष्काळजीपणे व हयगईने चालवून मोटार सायकलीला राँग साईडने जोराची धडक दिली. यात मोटार सायकल वरील रवि गोदाम आणि सतीश कसबे (दोघे रा. परळी जि. बीड) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर मोटार सायकलीचे नुकसान झाले आहे. मोटार सायकलीला धडक दिल्या नंतर कारचालक पळून गेला.दोघा जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करून रवी गोदाम याच्या पायाला गंभ...

सोसायटी अचिव्हर्स' इंग्रजी मॅगझिन्सच्या कव्हर पेजवर ना.पंकजाताई मुंडे झळकल्या!

इमेज
'इथिकल लिडरशीप' अशा शब्दांत राजकीय, सामाजिक प्रवासाचा मॅगझिनने केला गौरव मुंबई दि. २२ ----- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा महाराष्ट्रातील धडाडीच्या नेत्या ना. पंकजाताई मुंडे यांची एक विशेष मुलाखत 'सोसायटी अचिव्हर्स' या मुंबईतून प्रकाशित होणा-या सुप्रसिद्ध इंग्रजी मॅग्झिनने घेतली असून कव्हर पेजवर त्यांना स्थान दिले आहे. 'देअर इज नो सबस्टिट्यूट फाॅर इथिकल लीडरशीप' अशा शब्दांत त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय, सामाजिक प्रवासाचा मासिकाने गौरव केला  आहे.     'सोसायटी अचिव्हर्स' मॅग्झिनची एक स्पेशल एडिशन या महिन्यात  प्रसिद्ध झाली आहे. या इंग्रजी मासिकाचा देश विदेशात मोठा वाचक वर्ग आहे. ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या धडाकेबाज कामातून राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे शिवाय काम करण्याची त्यांची एक स्वतःची खास शैली आहे, अतिशय अभ्यासू व तळमळीने काम करणा-या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. एक लोकनेत्या म्हणून त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा ...

वाढत्या चोऱ्या: पोलिसांपुढे आव्हान

इमेज
गुढी उभारायला नव्या घरी गेले; जुन्या घरात चोरट्यांचा डल्ला:परळीत लाखोंचे दागिने लंपास परळी वैजनाथ : परळीच्या जुन्या गावभागातील आंबेवेस परिसरात चोरीची घटना घडली असून या घटनेत लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. नवीन घरात गुढी उभारण्यासाठी डांगे गल्लीतून खंडोबा गल्लीत गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून हा डल्ला मारला आहे. शहरातील आंबेवेस परिसरातील डांगे गल्ली येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. १८ मार्चच्या रात्री ही घरफोडी झाली असून, १९ मार्च रोजी ही बाब उघडकीस आली.पुरुषोत्तम चोथवे हे गुढीपाडव्यानिमित्त घराला कुलूप लावून खंडोबा मंदिर परिसरातील आपल्या दुसऱ्या घरी गेले होते. हीच संधी साधून चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.कपाटातील सोन्याची अंगठी, कानातील फुले, पुंगळे मणी, टॉपर, पट्टी गंठण, चांदीची चैन आणि पाच हजार रुपयांची नगदी असा खरेदी वेळेच्या किमतीनुसार एकूण दीड लाखाचा तर आजच्या सोन्याच्या बाजारभावानुसार सहा ते सात लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा द...
इमेज
  कर्तृत्वाला झळाळी: प्रतिष्ठित राष्ट्रीय सेलिब्रेटी मॅग्झिनने घेतली प्रेरक कार्याची दखल पंकजाताई मुंडे सोसायटी ॲचिव्हर्स मासिकाच्या कव्हर स्टोरीत झळकल्या ! मुंबई | प्रतिनिधी :         महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रतिष्ठित सोसायटी ॲचिव्हर्स  मॅग्झिन च्या कव्हर स्टोरीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा या विशेष अंकामध्ये प्रकाशित करण्यात आला असून, त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला आहे.        या कव्हर स्टोरीत त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धनातील उपक्रम आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील धोरणात्मक कामाचा आढावा घेण्यात आला आहे. ग्रामीण विकास, महिलांचे सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या कामाचीही विशेष दखल या लेखामध्ये घेण्यात आली आहे.राजकीय क्षेत्रातील त्यांचा प्रभावी प्रवास आणि विविध क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे.      ...

ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती..

इमेज
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती बीड दि. २० --- जिल्हयात काल आणि परवा गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.     अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली. बीड, वडवणी, आष्टीसह अन्य तालुक्यालाही कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा, टरबूज, मोसंबी या फळबागांचे तर गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मळणीसाठी काढून ठेवलेली पिके भिजल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश देऊन शासनाच्या संबंधित विभागाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ...

नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा

इमेज
परळीत २२ एप्रिल रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा सामुदायिक  उपनयन संस्कार सोहळा! नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-     ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने यावर्षी ४६ वा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा येत्या २२ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.    गेल्या ४५ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे सकाळी ८.५२ वा. संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी २१०० रु...

ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण व शुभारंभ...

इमेज
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परळीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ६७७ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता होणार प्रदान रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण  ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण व शुभारंभ परळी वैजनाथ | प्रतिनिधी...        प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परळी शहरातील तब्बल 677 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. सर्वांसाठी निवारा हे उद्दिष्ट घेऊन प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचे छत असावे या दृष्टिकोनातून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून 677 लाभार्थ्यांना ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या दिवशी दि. 19 रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे. ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट