कर्तृत्वाला झळाळी: प्रतिष्ठित राष्ट्रीय सेलिब्रेटी मॅग्झिनने घेतली प्रेरक कार्याची दखल




पंकजाताई मुंडे सोसायटी ॲचिव्हर्स मासिकाच्या कव्हर स्टोरीत झळकल्या !

मुंबई | प्रतिनिधी :
        महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रतिष्ठित सोसायटी ॲचिव्हर्स  मॅग्झिन च्या कव्हर स्टोरीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा या विशेष अंकामध्ये प्रकाशित करण्यात आला असून, त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला आहे.
       या कव्हर स्टोरीत त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धनातील उपक्रम आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील धोरणात्मक कामाचा आढावा घेण्यात आला आहे. ग्रामीण विकास, महिलांचे सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या कामाचीही विशेष दखल या लेखामध्ये घेण्यात आली आहे.राजकीय क्षेत्रातील त्यांचा प्रभावी प्रवास आणि विविध क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

        सोसायटी ॲचिव्हर्स  मॅग्झिन हे एक प्रतिष्ठित.    लाइफस्टाईल आणि सेलिब्रिटी मॅगझिन आहे. भारतातील नामांकित व्यक्ती, उद्योगपती, राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक यांच्या यशोगाथा या मॅगझिनमध्ये प्रकाशित केल्या जातात.यापुर्वीही पंकजाताई मुंडे यांच्या कार्याची दखल विविध प्रतिष्ठित मॅग्झिन्सनी घेतलेली आहे.सोसायटी ॲचिव्हर्स  मॅग्झिन धाडसी व प्रभावी महिला नेत्या या विशेषांकातही त्यांचा सन्मान केलेला आहे.या मॅग्झिनच्या कव्हर स्टोरीसाठी आता पंकजाताई मुंडे यांना स्थान मिळाले आहे. या अभिमानास्पद व प्रेरणादायी सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!