ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती..

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा




ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती

बीड दि. २० --- जिल्हयात काल आणि परवा गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

    अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली. बीड, वडवणी, आष्टीसह अन्य तालुक्यालाही कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा, टरबूज, मोसंबी या फळबागांचे तर गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मळणीसाठी काढून ठेवलेली पिके भिजल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश देऊन शासनाच्या संबंधित विभागाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...