नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा
परळीत २२ एप्रिल रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा!
नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-
ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने यावर्षी ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा येत्या २२ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या ४५ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे सकाळी ८.५२ वा. संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी २१०० रु.नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे.या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या उपनीत मुलांची नावनोंदणी करण्यासाठी अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२६ आहे. नोंदणीसाठी बंडू महाराज टिंबे (दक्षिणमुखी गणेश मंदिर परळी वै.) मो.क्र. ८९७५२९२१११, सचिन जोशी (न्यू जोशी मेडिकल मोंढा परळी वै.) मो.क्र. ९९२२२६१७४०, शिरिष राजुरकर वैद्यनाथ मंदिर ७५०७०५२०५०, गिरीश प्रयाग (प्रयाग इलेक्ट्रिकल आय डी बी आय बँकेसमोर) ९०२८८१११७२, जयराम गोंडे (स्माईल फोटो स्टुडीओ) मो.क्र.९८२३१३७२९५, प्रमोद औटी, साई विठ्ठल मल्टिसर्व्हिसेस,राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक मो.क्र. ९०२८८१११७३, विश्वांभर देशमुख (व्यंकटेश जनरल स्टोअर्स) मो. ९६५७६५६९५१, प्रदीप अग्निहोत्री प्रसाद जनरल स्टोअर्स मो.क्र.९०२८९०४०९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा, परळी वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा