ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण व शुभारंभ...

प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परळीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ६७७ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता होणार प्रदान




रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण 


ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण व शुभारंभ


परळी वैजनाथ | प्रतिनिधी...

       प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परळी शहरातील तब्बल 677 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. सर्वांसाठी निवारा हे उद्दिष्ट घेऊन प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचे छत असावे या दृष्टिकोनातून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून 677 लाभार्थ्यांना ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या दिवशी दि. 19 रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.

        परळी वैजनाथ शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्याचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत परळी वैजनाथ शहरातील ६७७ पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाडव्याच्या शुभमुहूर्तावर देण्यात येणार आहेत. या निमित्ताने लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर परळी वैजनाथ येथे पाडव्याच्या दिवशी दि.१९ रोजी सकाळी ११.३० वाजता राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे धनादेश/अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर दिव्यांग  कल्याण विभाग मंत्रालय उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे आदीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना  2.0 ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच निम्न व मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना सुरक्षित व पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते. पहिला हप्ता मिळाल्यानंतर घरबांधणीच्या कामांना गती मिळून लाभार्थ्यांना लवकरात लवकर स्वतःच्या घरात राहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण केले जाणार आहे.

      नगर परिषद परळी वैजनाथच्या वतीने यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. निधीचे वितरण पारदर्शक आणि वेळेवर व्हावे यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शहरातील झोपडपट्टीमुक्ती व “सर्वांसाठी निवारा” या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला असून पहिल्या हप्त्याच्या वितरणानंतर परळी शहरात मोठ्या प्रमाणावर पक्क्या घरांच्या उभारणीला गती मिळणार आहे. त्याचबरोबर रमाई आवास योजनेच्या अंतर्गत उद्दिष्ट देण्यात आलेल्या 200 नवीन प्रस्तावांचा शुभारंभ होणार आहे. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या सहाय्यता निधीचे वितरणही या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास मोठी संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्षा खैसर राजाखान पठाण , बांधकाम सभापती प्रा.पवन मुंडे, मुख्याधिकारी पी.एन. निगळ, उप मुख्याधिकारी संतोष रोडे, तसेच सर्व सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...