#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

सोसायटी अचिव्हर्स' इंग्रजी मॅगझिन्सच्या कव्हर पेजवर ना.पंकजाताई मुंडे झळकल्या!

'इथिकल लिडरशीप' अशा शब्दांत राजकीय, सामाजिक प्रवासाचा मॅगझिनने केला गौरव

मुंबई दि. २२ ----- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा महाराष्ट्रातील धडाडीच्या नेत्या ना. पंकजाताई मुंडे यांची एक विशेष मुलाखत 'सोसायटी अचिव्हर्स' या मुंबईतून प्रकाशित होणा-या सुप्रसिद्ध इंग्रजी मॅग्झिनने घेतली असून कव्हर पेजवर त्यांना स्थान दिले आहे. 'देअर इज नो सबस्टिट्यूट फाॅर इथिकल लीडरशीप' अशा शब्दांत त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय, सामाजिक प्रवासाचा मासिकाने गौरव केला  आहे. 

   'सोसायटी अचिव्हर्स' मॅग्झिनची एक स्पेशल एडिशन या महिन्यात  प्रसिद्ध झाली आहे. या इंग्रजी मासिकाचा देश विदेशात मोठा वाचक वर्ग आहे. ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या धडाकेबाज कामातून राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे शिवाय काम करण्याची त्यांची एक स्वतःची खास शैली आहे, अतिशय अभ्यासू व तळमळीने काम करणा-या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. एक लोकनेत्या म्हणून त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा या मुलाखतीत घेण्यात आला आहे. मॅग्झिनच्या संपादिका ॲन्ड्रेया कोस्टबीर यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली आहे. एकूणच त्यांच्या कार्य प्रवासाच्या टप्प्यातील विविध पैलू फोटोच्या माध्यमातूनही उलगडले  आहेत.  विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या देखील मुलाखती या मासिकात घेतल्या गेल्या आहेत. 

यशस्वीतांच्या स्टोरीचा भाग झाल्याचा आनंद

-----------------

मॅगझिनच्या संपादिका ॲन्ड्रेया कोस्टबीर, अशोक धामणकर यांनी शनिवारी ना.पंकजाताई मुंडे यांची त्यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन या स्पेशल एडिशनचे त्यांच्या हस्ते प्रकाशन केले. प्रकाशन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ना. पंकजाताईंनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, सोसायटी अचिव्हर्स मॅगझिनने त्यांच्या कव्हर स्टोरी ' मध्ये मला स्थान दिले, त्याबद्दल सोसायटी टीमचे आणि विशेषतः अँड्रिया व धामणकर यांचे मनापासून आभार मानते. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाची ही झलक नक्की वाचा असे आवाहन त्यांनी वाचकांना केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....