#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

केज अंबाजोगाई रोडवर घटना

मोटार सायकलला कारची धडक : मोटारसायकल वरील परळीचे दोन युवक जखमी



केज :- केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या माऊली जिनिंग समोर एका मोटार सायकलीला भरधाव वेगातील कारने राँग साईडने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  

     दि. १९ मार्च रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास केज येथे सेंट्रिगचे काम करुन परळीकडे मोटार सायकल क्र. (एम एच-२३/ बी एल-५०५३) वरून परळी कडे जात होते. त्यावेळी त्यांना केज-अंबाजोगाई रोडवर केज येथील उपजिल्हा रुग्णालय जवळ असलेल्या माऊली जिनिंग जवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील बलेनो कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या कारने तिच्या समोरील एका वाहनाला ओहरटेक करीत असताना भरधाव वेगातील कार निष्काळजीपणे व हयगईने चालवून मोटार सायकलीला राँग साईडने जोराची धडक दिली. यात मोटार सायकल वरील रवि गोदाम आणि सतीश कसबे (दोघे रा. परळी जि. बीड) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर मोटार सायकलीचे नुकसान झाले आहे. मोटार सायकलीला धडक दिल्या नंतर कारचालक पळून गेला.दोघा जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करून रवी गोदाम याच्या पायाला गंभीर दुखापत असल्याने त्याच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....