#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

वाढत्या चोऱ्या: पोलिसांपुढे आव्हान

गुढी उभारायला नव्या घरी गेले; जुन्या घरात चोरट्यांचा डल्ला:परळीत लाखोंचे दागिने लंपास



परळी वैजनाथ : परळीच्या जुन्या गावभागातील आंबेवेस परिसरात चोरीची घटना घडली असून या घटनेत लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. नवीन घरात गुढी उभारण्यासाठी डांगे गल्लीतून खंडोबा गल्लीत गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून हा डल्ला मारला आहे.

शहरातील आंबेवेस परिसरातील डांगे गल्ली येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. १८ मार्चच्या रात्री ही घरफोडी झाली असून, १९ मार्च रोजी ही बाब उघडकीस आली.पुरुषोत्तम चोथवे हे गुढीपाडव्यानिमित्त घराला कुलूप लावून खंडोबा मंदिर परिसरातील आपल्या दुसऱ्या घरी गेले होते. हीच संधी साधून चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.कपाटातील सोन्याची अंगठी, कानातील फुले, पुंगळे मणी, टॉपर, पट्टी गंठण, चांदीची चैन आणि पाच हजार रुपयांची नगदी असा खरेदी वेळेच्या किमतीनुसार एकूण दीड लाखाचा तर आजच्या सोन्याच्या बाजारभावानुसार सहा ते सात लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....