इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *कलेचे कौतुक:चित्रकार मैथिली लोंढे,अथर्व कुलकर्णी तसेच ऋषिकेश सुपेकर यांनी रेखाटली शिवरायांचे मनमोहक चित्रे*

 *कलेचे कौतुक:चित्रकार मैथिली लोंढे,अथर्व कुलकर्णी तसेच ऋषिकेश सुपेकर यांनी  रेखाटली शिवरायांचे मनमोहक चित्रे* 













             ⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

परळी वैजनाथ /प्रतिनिधी .....

      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व स्तरातून वंदन केले जात आहे.विविध पद्धतीने प्रत्येक जण शिवजयंती साजरी करत असतो. कलाकारही यात अग्रभागी आहेत.परळीतील चित्रकार मैथिली बाळकृष्ण लोंढे हिने शिवरायांचे आकर्षक पोस्टर चित्र रेखाटले आहे. पैठण येथील युवा चित्रकार अथर्व सुदेशराव कुलकर्णी या युवा चित्रकाराने रांगोळीचित्र साकारले तर गंगाखेड येथील बालचित्रकार ऋषिकेश सतिश सुपेकर यानेही सुंदर चित्र रेखाटले आहे.या कलाकृतींचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

कु.मैथिली बाळकृष्ण लोंढे हिने रेखाटन केलेलं
 शिवरायांचे आकर्षक पोस्टर चित्र.


      











छत्रपती शिवाजी महाराज जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.'शिवराय घराघरात- शिवराय मनामनात' हे खर्या अर्थाने दिसुन आले.प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र होत वंदन केले. 


चि.अथर्व सुदेशराव कुलकर्णी पैठण या युवा
 चित्रकाराने रंगवलेले शिवरायांचे रांगोळी चित्र 














कलाकारही यात अग्रभागी आहेत.परळीतील चित्रकार मैथिली बाळकृष्ण लोंढे हिने शिवरायांचे आकर्षक पोस्टर चित्र रेखाटले आहे. पैठण येथील युवा चित्रकार अथर्व सुदेशराव कुलकर्णी या युवा चित्रकाराने रांगोळीचित्र साकारले तर गंगाखेड येथील बालचित्रकार ऋषिकेश सतिश सुपेकर यानेही सुंदर चित्र रेखाटले आहे.या कलाकृतींचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

चि.ऋषिकेश सतिश सुपेकर गंगाखेड या
बालचित्रकाराने रेखाटलेले शिवरायांचे सुंदर चित्र.


-----------------------------------------------------------------

⭕ *धनंजय मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती.*

🏵️ *परळीमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला.*

🔸 *परळीत साकारणार 'सेवागड़': सोमवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*

आवर्जून बघा:🏵️ *शिवजयंतीला ना.धनंजय मुंडे यांनी केली परळीत महत्त्वपूर्ण घोषणा.*

🏵️ *आवश्य बघा: परळीत शिवजयंतीचा उत्साह,रोशनाई आणि दैदिप्यमान सजावट.*

⭕ *शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम: ना. धनंजय मुंडेच्या उपस्थितीत झाला सामुदायिक मंगल परिणय सोहळा*

🟥 *अध्यात्मिक गौरव: शंकराचार्य पिठाकडून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना "यज्ञ मार्तंड" उपाधी*

🏵️ *शिवरायांना कलात्मक वंदन:युवा चित्रकाराचे सर्व स्तरातून कौतुक.*

🏵️ दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

🏵️हे देखील वाचा-🏵️ *वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत*

🌑 *परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या*

🏵️हे देखील वाचा-⭕ *एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली*

-----------------------------------------
MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
-----------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!