पोस्ट्स

मे ३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  संघर्षातून यशाकडे: भांडी-धुणी करणाऱ्या माऊलीच्या लेकीची १२ वीच्या परीक्षेत मोठी झेप! परळी वैजनाथ,प्रतिनिधी... आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी-धुणी करून काबाडकष्ट केले आणि मुलीनेही त्या कष्टाचे चीज करत १२ वीच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या तनुजा रणदिवे या मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनुजा ची आई पद्मिन तानाजी रणदिवे  गेल्या अनेक वर्षांपासून गणेशपार भागात धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पतीच्या निधनानंतर व आर्थिक स्थिती हलाखीची असताना घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. "माझ्या वाट्याला आलेले कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत," याच एका ध्येयाने या माऊलीने दिवसरात्र काम केले. परळी येथे हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या व घरात अभ्यासासाठी वेगळी खोली नाही की महागडे क्लास लावण्याची सोय नव्हती. आई कामावर गेल्यावर घरची कामे आटपून ही मुलगी अभ्यासाला बसायची. रात्री उशिरा पर्यंत तिने चिकाटीने अभ्यास केला. कष्टाचे मोल जाणणाऱ्या तनुजाने अभ्यासात कधीही ...
इमेज
  संघर्षातून यशाकडे: भांडी-धुणी करणाऱ्या माऊलीच्या लेकीची १२ वीच्या परीक्षेत मोठी झेप! परळी वैजनाथ,प्रतिनिधी... आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी-धुणी करून काबाडकष्ट केले आणि मुलीनेही त्या कष्टाचे चीज करत १२ वीच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या तनुजा रणदिवे या मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनुजा ची आई पद्मिन तानाजी रणदिवे  गेल्या अनेक वर्षांपासून गणेशपार भागात धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पतीच्या निधनानंतर व आर्थिक स्थिती हलाखीची असताना घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. "माझ्या वाट्याला आलेले कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत," याच एका ध्येयाने या माऊलीने दिवसरात्र काम केले. परळी येथे हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या व घरात अभ्यासासाठी वेगळी खोली नाही की महागडे क्लास लावण्याची सोय नव्हती. आई कामावर गेल्यावर घरची कामे आटपून ही मुलगी अभ्यासाला बसायची. रात्री उशिरा पर्यंत तिने चिकाटीने अभ्यास केला. कष्टाचे मोल जाणणाऱ्या तनुजाने अभ्यासात कधीही ...
इमेज
भूसंपादन प्रकरणी नागरिकाची तक्रार ; प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत:न्याय देण्याची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – भूसंपादन प्रकरणात न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ एका नागरिकाने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. संबंधित प्रकरणाची दखल घेत पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याची खंत या नागरिकाने व्यक्त केली आहे.          उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, परळी वैजनाथ (भूसंपादन विभाग) कार्यालयाकडून दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी संबंधित अर्जदारास पत्र देण्यात आले आहे. या पत्रानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ, औरंगाबाद येथील आदेश क्रमांक 1956/2024 संदर्भात अर्जदाराने न्याय मिळावा व जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा, यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्याने अर्जदाराने आंदोलनाचा मार्ग अवलंबत 1 मे 2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित प्रकरण भूसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 28-अ अंतर...
इमेज
  पश्चिम बंगाल चा निकाल  भाजप कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंददायी व उत्साह वाढवणारा - ना. पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या कुशल रणनितीचा विजय मुंबई दि. ०५--- पश्चिम बंगाल मध्ये झालेला दणदणीत विजय हा अत्यंत आनंददायी व देशभरातील तमाम भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे सर्वमान्य, विकसनशील नेतृत्व आणि केंद्रीय गृहमंत्रीअमितभाई यांनी चाणक्याप्रमाणे केलेले फुलप्रूफ प्लॅनिंग त्यासमवेत भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांचे अविरत कष्ट या सर्वांचे हे यश आहे. या सर्व यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि मनापासून आनंद व्यक्त करत आहे असं ना. पंकजाताई यांनी म्हटलं आहे. ••••
इमेज
  परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा विरोधात परळीत ‘रास्ता रोको’ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.           अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला...

परळीत उत्साहात कामगार मेळावा

इमेज
  असंघटित कामगारांना किमान ३० हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे; कॉम्रेड किरण मोघे यांचे प्रतिपादन परळीत उत्साहात कामगार मेळावा परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन म्हणून दरमहा ३० हजार रुपये मिळालेच पाहिजेत, ही 'सीटू'ची आग्रही भूमिका आहे, असे प्रतिपादन सीटू महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. किरण मोघे यांनी केले. बीड जिल्हा सीटूच्या वतीने जागतिक कामगार दिनानिमित्त परळी येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित कामगार मेळाव्यात त्या बोलत होत्या..          मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी. जी. खाडे होते. यावेळी व्यासपीठावर आशा संघटनेच्या नेत्या कॉ. किरण सावजी, जालिंदर गिरी, सुनिता ताटे, शालेय पोषण आहार संघटनेचे नेते कॉ. प्रभाकर नागरगोजे आणि सुवर्णा रेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना कॉ. किरण मोघे म्हणाल्या की, १८८९ साली शिकागो येथील कामगारांच्या आंदोलनावर गोळीबार झाला होता. त्या बलिदानातून आणि कामगारांच्या प्रखर लढ्यातूनच '८ तास काम' असा जागतिक नियम ठरवण्यात आला. या लढ्याची आठवण म्हणून १ मे हा दिवस 'कामगार द...

अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांचा परळीत प्रभावी ‘जनता दरबार' परळी, बीडसह जिल्ह्यातील  नागरिकांच्या समस्यांचा जागेवर निपटारा परळी वैजनाथ  दि.०२ ---  परळीसह बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करता यावे, त्यांचे जीवन कष्टमुक्त व्हावे या उदात्त हेतूने ना. पंकजाताई मुंडे या त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात ‘जनता दरबाराचे' आयोजन करतात. नेहमी प्रमाणे आजही त्यांचा भव्य जनता दरबार संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शासकीय विश्रामगृहात ना. पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार पार पडला. यात बीड जिल्ह्यातील आणि परळी तालुक्यातील असंख्य नागरिकांनी त्यांच्या समस्या व गाऱ्हाणी मांडल्या. ना. पंकजाताई मुंडे यांनी तत्परतेने प्रत्येक विषयात लक्ष देऊन संबंधित शासकीय, निमशासकीय विभागांना बोलून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार ---- ना. पंकजाताई मुंडे ...

बँकेच्या प्रगतीचे कौतुक

इमेज
वैद्यनाथ बँकेच्या प्रगतीचा ना. पंकजा मुंडे यांच्याकडून आढावा बँकेच्या आर्थिक कामगिरीचे केले कौतुक ; एनपीए शुन्य टक्के तर एकूण नफा ८ कोटी परळी वैजनाथ दि. ०२ -- लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने मराठवाड्‌यातील अग्रगण्य बँक असेलेल्या दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या कामकाजाचा व आर्थिक प्रगतीचा राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री तथा बँकेच्या  ना. पंकजाताई मुंडे यांनी आज बँकेची मार्गदर्शक या नात्याने आढावा घेतला.    बँकेचे चेअरमन विनोद सामत, व्हा चेअरमन रमेश कराड व संचालक मंडळ व अधिका-यांनी यहबँकेच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती सादर केली. ३१ मार्च २०२६ रोजी अखेर बँकेच्या ठेवी ६९६ कोटी असून एकूण कर्ज ४६५ कोटी, गुंतवणूक ३९६ कोटी, सी.आर.ए.आर. १८.१७ टक्के, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के, एकूण नफा ८.०१ कोटी व निव्वळ नफा ४.०४ कोटी इतका आहे. बँकेच्या प्रगतीचे कौतुक ------- ना. पंकजाताई मुंडे यांनी बँकेच्या आर्थिक कामगिरीचे कौतुक करत, बँकेने वित्तीय शिस्त राखत प्रगती साधल्याचे नमूद केले. तसेच बँकेचे निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के केल्याने संचालक मंडळ...

विज्ञान शाखेतून स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम, विज्ञान शाखेचा १०० टक्के, तर कला शाखेचा ७६.८ टक्के  विज्ञान शाखेतून स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम  परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)         लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाने १२ वी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून स्नेहल अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम आली आहे. याबदल प्राचार्या व संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.              शहरातील लक्ष्मीबाई देशमुख कनिष्ठ महिला महाविद्यालयाने बारावी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून काँलेजचा निकाल ९२.८१ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेची विद्यार्थिनी विज्ञान शाखेतून प्रथम स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे (७९.६७), द्वितीय- शेख अनम सिराज (७४.५०), तृतीय- सय्यद झवेरिया अफसर (७३.८३) तर कला शाखेची विद्यार्थिनी शेख मसिरा मोईझ (७८.८३) प्रथम, द्वितीय शेख इशरत बेगम सलीम  (७२.५०), त...

परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात...

इमेज
महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा : परळी केंद्रातील संच क्र. ६ चा ऐतिहासिक उच्चांक - मुख्य अभियंता सुनील इंगळे परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात परळी | प्रतिनिधी “महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महानिर्मितीचा मोलाचा वाटा असून राज्याच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक प्रगतीसाठी अखंडित वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संच क्रमांक ६ ने सलग १४० दिवस पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला असून महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा प्रदान केली आहे,” असे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी केले.ते ६६ व्या महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. परळी औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवार दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
इमेज
सार्वजनिक बांधकाम विभागातील भरती: खेळाडूंना 'मॅट'चा मोठा दिलासा, दोन महिन्यांत नियुक्ती देण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर: सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) 'स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक' (गट-क) पदाच्या भरती प्रक्रियेत ५ टक्के क्रीडा आरक्षणांतर्गत डावलण्यात आलेल्या दोन उमेदवारांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे या उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्वाळा देत मॅटने या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर दोन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. 'मॅट'चे उपाध्यक्ष न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आणि सदस्य (प्रशासकीय) विनय कारगावकर यांनी हा निकाल दिला. नेमके प्रकरण काय? सार्वजनिक बांधकाम विभागाने १० ऑक्टोबर २०२३ रोजी २१०९ पदांसाठी भरतीची जाहिरात (क्र. ०१/२०२३) प्रसिद्ध केली होती. यामध्ये जळगाव येथील कल्पेश भगवान वंजारी याने 'भज-ड' (NT-D) क्रीडा प्रवर्गातून, तर छत्रपती संभाजीनगरच्या राधिका दिलीप पाटील हिने 'खुला' (Open) क्रीड...
इमेज
  जोयानबा मजाजोद्दीन इनामदार चे १२ वी परीक्षेत घवघवीत यश: महाविद्यालयातून तृतीय क्रमांक परळी वै. (प्रतिनिधी):      परळी वैजनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते मजाजोद्दीन इनामदार यांची सुकन्या जोयानबा हिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिने महाविद्यालयातील तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.        इमदादूल उलूम उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शेख खाजा शेख महेताब व संस्थेचे सचिव सय्यद हनिफ सय्यद करिम व उपाध्यक्ष. शेख मुजफ्फर शेख महेबूब सह सचिव सय्यद इस्माईल सय्यद करीम, ताज खान अमीर खान, सय्यद हुसेन सय्यद करीम, सय्यद मुस्तफा सय्यद करीम ,अमजद अली जागीरदार , मुसा खान गुलाब खान, मोहम्मद रफीक मोहम्मद रज्जाक आदी उपस्थितीत होते. तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सय्यद वाजेद सय्यद कादर, प्रा. महेमूद सिद्दीकी, प्रा. सय्यद नईम, प्रा. सय्यद एकबाल इत्यादी उपस्थित होते. ङ्कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सय्यद ईकबाल यांनी क...

आरोपी पोलिसांच्या ताब्यात ....

इमेज
  केजमध्ये पुन्हा अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! शरीर संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! केज :- केज तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचाराची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला घरी बोलावून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आई, वडील भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. केज शहरातील एका भागात राहत असलेली शालेय शिक्षण घेत असलेली १५ वर्ष १० महिने वयाच्या मुलीचा पंधरा दिवसापूर्वी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १:०० ते ३:०० वा. च्या दरम्यान एका नराधमाने पाठलाग करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून तिला त्याच्या राहते घरी बोलावुन घेतले. त्या नंतर त्याने त्या अल्पवयीन मुली सोबत बळजबरीने आणि जबरदस्तीने शारीरिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले. सदर घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीच्या आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलीच्या मोबाईलवर आरोपीने व्हिडीओ कॉल करुन त्याचे मोबाईलची स्क्रीन शेअर केली आणि त्याच्याकडे असलेल्या पेनड्रा...
इमेज
‘… तोपर्यंत राजकारण्यांनो भेटायला येऊ नका’ नसरापूर मुलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया पुणे (Pune) जिल्हयातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर (Nasrapur) येथे घडलेल्या ४ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, पीडित मुलीच्या वडिलांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांना एक कळकळीची विनंती केली आहे. पीडितेच्या वडिलांची व्हिडिओद्वारे विनंती पीडित मुलीचे वडील अस्थी विसर्जनासाठी देहू (Dehu) येथे गेले असताना त्यांनी हा व्हिडिओ संदेश जारी केला. त्यांनी म्हटले की, “जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत एकाही राजकीय नेत्याने सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी येऊ नये. जेव्हा त्या गुन्हेगाराला फाशी होईल, तेव्हाच आम्ही राजकारण्यांना भेटू.” ही आपली आणि आपल्या कुटुंबाची नम्र इच्छा असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर; परळी पॅटर्न तयार करणार- किरण गित्ते IAS

इमेज
 डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँड शाळेचे शानदार उद्घाटन शिक्षणानेच समृद्धी व उन्नती; परळीतील या शैक्षणिक उपक्रमांसाठी सदैव पाठिशी - ना पंकजा मुंडे वंडरलँड मुळे परळीत अधुनिक शिक्षणाचे दालन खुले झाले - आ.धनंजय मुंडे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर; परळी पॅटर्न तयार करणार- किरण गित्ते IAS परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –        विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल (डी.डब्ल्यू.पी.एस.) वंडरलँड शाळेचे उद्घाटन शनिवारी (दि. २ मे) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे,माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास मा. श्री किरण गित्ते साहेब IAS ,माजी आमदार संजय दौंड,परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, सौ. उषाताई किरण गित्ते यांची उपस्थिती लाभली.           डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँडनाथ रोड, परळी वैजनाथ येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी पंकजाताई मुंडे,आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्या...
इमेज
  मोबाईल परत देण्याचा बहाण्याने वृद्ध शेतकऱ्याच्या खात्यातील १ लाखांवर डल्ला! धारूर: हारवलेला मोबाईल परत देण्याचे नाटक करून एका ६२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या बँक खात्यातून १ लाख रुपये लांबवल्याची धक्कादायक घटना धारूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, सायबर चोरट्यांच्या या नव्या पद्धतीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धारूर येथील कसबा विभागात राहणारे सुधीर नारायण चंद्रे हे शेती आणि पुरोहितचे काम करतात. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७.४० च्या सुमारास ते आपल्या शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना टोलनाक्याच्या पुढे त्यांचा मोबाईल रस्त्यात कोठे तरी पडला. घरी आल्यावर मोबाईल नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मुलाने त्याच नंबरवर फोन केला असता तो समोरून एका व्यक्तीने उचलला. मोबाईल धारूरच्या घाटात सापडला असून तो घेऊन जा, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर दोन २० ते २५ वयोगटातील तरुणांनी घाटामध्ये चंद्रे यांच्या मुलाला मोबाईल परत केला. मोबाईल हातात आल्यानंतर सुधीर चंद्रे यांनी आपल...

आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

इमेज
नात्याला काळीमा: आईसोबत आजोळी आलेल्या तीन वर्षाच्या निरागस नातीवर नराधम आजोबाने केला अत्याचार  केज:- केज तालुक्यातील एका गावात एका ५० वर्षाच्या लिंगपिसाटाने स्वतःच्या अवघ्या ३ वर्ष वयाच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक विवाहित तरुणी ही तिच्या माहेरी आलेली असताना त्या विवाहित तरुणीच्या वडिलांनी स्वतःच्याच मुलीच्या तीन वर्ष वयाच्या चिमुकलीच्या गुप्तंगात बोट घालून तिच्यावर अत्याचार केला आहे. ही घटना दि. १६ ते दि. २५ एप्रिल दरम्यान अनेकवेळा कुकर्म केले आहे. त्या चिमुकलीने तिला त्रास होऊ लागल्याने हा प्रकार आईला सांगितला. त्या नंतर त्या विवाहित मुलीने तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. ११८/२०२६ भा. न्या. सं. ६४(२) (एफ)(आय)(एम), ६५(२) या सह पोक्सोचे कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी दि. १ मे रोजी रात्री नराधम लिंगपिसाट आजोबाला ताब्यात ...
इमेज
संस्कार शिबिरांमुळे मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती शक्य !- उपविभागीय अधिकारी श्री अरविंद लाटकर  परळी वैजनाथ, दि. २-              आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धामुळे सर्वत्र चिंतेचे व अशांततेचे साम्राज्य पसरले असतानाच संस्कार शिबिरासारख्या प्रेरक उपक्रमांमुळे जगात प्रेम, सदाचार, दया, करुणा, सच्चारित्र्य, माणुसकी, सहिष्णुता आदी मानवी मूल्यांची जोपासना होऊन शांतता व सुख समृद्धी नांदू शकते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी श्री अरविंद लाटकर यांनी केले.         परळी येथून जवळच असलेल्या नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या "मानवता संस्कार व आर्य वीर दल प्रशिक्षण" शिबिराचा काल विविध कार्यक्रमांनी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री लाटकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाज परळीचे प्रधान श्री जुगल किशोर लोहिया हे होते.यावेळी श्री हरिसिंह आर्य (दिल्ली), निवृत्त नायब तहसीलदार श्री बाबुराव रुपनर, उग्रसेन राठौर, रंगनाथ तिवार , प्रशांतकुमार शास्त्री, डॉ. मधुसूदन काळे, आचार्य सत्येंद्र...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....