प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली



बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले. 

 सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत.

बीड जिल्हयातून न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण 11353 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्टच्या प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी 371 प्रकरणे निकाली निघाली आहेत.

दाखलपुर्व प्रकरणामध्ये एकूण 21115 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 838 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच स्पेशल डाईव्हचे एकूण प्रलंबीत प्रकरणापैकी 390 प्रकरणे निकाली निघाली आहेत. असे एकूण 1599 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 7 कोटी 42 लाख 59 हजार 339 एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली आहेत.

बीड मुख्यालयातून कौटुंबिक न्यायालयातील एकूण 5 प्रकरणे निकाली निघाली असून यामध्ये पाच महिला सासरी नांदावयास जाणेची प्रकरणे यशस्वी झाली आहेत. तसेच मोटार अपघात प्रकरणात एका प्रकरणामध्ये ₹4 कोटी 48 लाख 90 ची* प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.

सदरील लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी डाॅ.वहाब ए.सय्यद, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्यासह बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी तसेच वकील संघाचे सर्व सदस्य, जिल्हा सरकारी वकील व सर्व सरकारी अभियोक्ता तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक एस.पी.झेंड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस.टी.शिंदे व इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांची लोकन्यायालयात प्रमुख उपस्थिती होती.

न्यायालयीन कर्मचारी, बॅंक कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या