वैद्यनाथ कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

 विद्यार्थ्यांच्या वैचारिक संपन्नतेसाठी संतुलित वाचनाशिवाय पर्याय नाही -रणजीत धर्मापुरीकर


वैद्यनाथ कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा 

 परळी वै. :प्रतिनिधी


वैद्यनाथ कॉलेज मध्ये भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.  प्राचार्य डॉ. आर डी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून याना पुष्पहार घालून  त्यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी मंचावर प्रमुख वक्ते श्री . रणजीत धर्मापुरीकर उपप्राचार्य व्ही.बी. गायकवाड आय क्यू ए. सी समन्वयक डॉ. बी. व्ही. केंद्रे. डॉ. एस ए. धांडे ग्रंथपाल उपस्थित होते.  श्री . रणजीत धर्मापुरीकर  माजी माहिती शास्त्रज्ञ स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांच्या  विशेष व्याख्याना मध्ये बोलतांना त्यांनी वाचन संस्कृती वाढीसाठी वाचनाची सप्तपदी पद्धत सुचवली. 


Click-■ भेल संस्कार केंद्रात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा


      त्यामध्ये त्यांनी सांगितले की विद्यार्थी जीवनाला वैचारिक संपन्न करण्यासाठी विविध साहित्याचे प्रकार जसे ललित, काव्य, लेख, नाटक वाचनाचे संतुलित वाचन असावे, अशा साहित्याची सूची वाचनासाठी करावी. वाचनाचा वेळ ठरवावा, वाचनानंतर चिंतन करावे, वाचलेले दुसर्यांना सांगावे, तंत्रज्ञाचा वापर करावा, शांत जागा शोधावी, चर्चा करावी आणि वाचनासाठी स्वतः ला प्रेरित करावे. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला  विद्यार्थ्यांचे ग्रंथ अभिवाचन झाले, त्यामध्ये प्रतीक्षा साखरे, श्रावणी साबणे, जहीर खान, राहील पठाण या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. डी. राठोड सरानी अध्यक्षीय भाषणामध्ये वाचन संस्कृती आणि महाविद्यालयाचे विद्यार्थयांसाठी प्रयत्न यावर प्रकाश टाकला, विद्यार्थी व प्राध्यापकांनी ग्रंथालयाचा ज्यास्तीत ज्यास्त ऊपयोग, करून घ्यावा  असे सुचविले. या  कार्यक्रमाचे  आयोजक विभाग प्रमुख डॉ. एस . ए. धांडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार डॉ. एम .जी. लांडगे यांनी मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  ग्रंथालयीन कर्मचारी श्री. पी. एम. मुंढे, नागेश केंद्रे, श्रीमती रुचिरा फड यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------

■ video News 








■ Flash Back NEWS 

Click-*श्री. पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा*

Click-■ मराठी वाङ्मयमंडळ भाषा समृद्ध करते- प्रो.डॉ.एम. बी. धोंडगे

Click- ■ आशा व गटप्रर्वतकांचा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Click-■ Pankaja Munde:मी येत आहे, आपल्या दसऱ्यासाठी..२४ ऑक्टोबरला भेटूया.. आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोल्लंघनाला!

Click-■ न्यू हायस्कूल ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांने पटकावले सुवर्णपदक

Click-■ शिक्षण व रोजगार खाजगीकरण विरोधात विद्यार्थी युवक रस्त्यावर

Click-आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू ; अंत्यविधीला उपस्थित राहून जरांगे पाटीलांची श्रद्धांजली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !