सणासुदीत विजेचा अखंडित खोळंबा:नागरिकांतील संतापाच्या भावनांची कोणीतरी दखल घ्यावी

इतर सणांप्रमाणेच नवरात्रोत्सवातही परळीतील महावितरणाचा ठरलेला नेहमीचा 'दांडी'या सुरुच !


सणासुदीत विजेचा अखंडित खोळंबा:नागरिकांतील संतापाच्या भावनांची कोणीतरी दखल घ्यावी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
         सध्या शारदीय नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक दुर्गेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच विविध मंडळांनी दांडिया महोत्सवाचे तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र इतर सणांप्रमाणेच नवरात्रोत्सवातही परळीतील महावितरणाचा ठरलेला नेहमीचा 'दांडी'या सुरुच आहे.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही  ऐन सणासुदीच्या काळात शहरात रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
     नवरात्रोत्सव उत्सवात सुरु आहे.कालरात्री देवी व डोंगरतुकाईमंदिरात पहाटे चार वाजल्यापासून भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. यावेळी शहरातील नागरिक, महिला, युवक, युवती पायी दर्शनासाठी कालरात्री देवी व डोंगरतुकाई देवीला जातात. तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी देवींची स्थापना केलेली  आहे. अनेक मंडळांनी विविध उपक्रम, दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे. याठिकाणीही रात्री उशिरापर्यंत महिला मंडळाची मोठी गर्दी आहे. मात्र नवरात्रीच्या धामधुमीत वीजवितरण कंपनीने मात्र दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपली परंपरा सुरू ठेवली असून जसा नवरात्रोत्सव सुरू झाला आहे तसे विजेचा लपंडावही सुरू झाला आहे.

        कालरात्री देवी जुन्या गावभागात असून नवरात्री सुरू होण्यापूर्वी या परिसरातील नागरिकांनी आमच्या भागातील वीजपुरवठा नवरात्रोत्सवात सुरळीत चालू ठेवावा. याठिकाणी असलेल्या त्रुटी दूर कराव्यात; कारण संपूर्ण शहर व परिसरातील भक्तमंडळी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हा वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी केली पण याची दखल वीजवितरण कंपनीने घेतली नाही. ऐन नवरात्रोत्सवात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. कालरात्री देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला, युवतींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


■  नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता राठोड यांना लोंबकळणाऱ्या तारा, गणेशपार भागातील रोहित्रावरील उघडे फ्युजबाबत वारंवार तक्रार करूनही कुठलीही दुरुस्ती झाली नाही व वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने भाविकांना व नागरिकांना नाहक त्रास होत आहे. नवरात्र उत्सवादरम्यान शहरातील भाविक काळरात्री मंदिराकडे पहाटेपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी येत असतात. परंतु वारंवार वीज जात असल्यामुळे छेडछाड किंवा लुटीचे प्रकार घडू शकतात यामुळे त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा.
        - अश्विन मोगरकर,सामाजिक कार्यकर्ते

नवरात्रीचे नऊ दिवस परळी शहरातील वीजेचा लपंडाव बंद करण्यात यावा अन्यथा या काळात कोणत्याही महिलेवर काही विदा रक परिस्थिती आल्यास किंवा महिलांचे दागिने वगैरे चोरी झाल्यास त्यास पुर्णतः जबाबदार धरून महावितरण कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
  - वैजनाथ माने शहरप्रमुख, शिवसेना( शिंदेगट)
----------------------------------------------------

-----------------------------------------------------

■ video News 








■ Flash Back NEWS 

Click-*श्री. पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा*

Click-Click-■ भेल संस्कार केंद्रात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा

Click-■ मराठी वाङ्मयमंडळ भाषा समृद्ध करते- प्रो.डॉ.एम. बी. धोंडगे

Click- ■ आशा व गटप्रर्वतकांचा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Click-■ Pankaja Munde:मी येत आहे, आपल्या दसऱ्यासाठी..२४ ऑक्टोबरला भेटूया.. आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोल्लंघनाला!

Click-■ न्यू हायस्कूल ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांने पटकावले सुवर्णपदक

Click-■ शिक्षण व रोजगार खाजगीकरण विरोधात विद्यार्थी युवक रस्त्यावर

Click-आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू ; अंत्यविधीला उपस्थित राहून जरांगे पाटीलांची श्रद्धांजली


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार