युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही - प.पु.प्रदीप मिश्रा*

*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही -  प.पु.प्रदीप मिश्रा*




*_वैद्यनाथांच्या भूमीत जन्म होणे महादेवाची कृपा_*



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.१७ - शहरात मथुरा प्रतिष्ठान द्वारा आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेच्या तृतीय दिनी श्रोत्यांनी कथेचे मनोभावे श्रवण केले.आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात कधीही दुःख येणार नाही असे प्रतिपादन
आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी केले.श्रावण पर्वात होत असलेल्या या कथा श्रवणासाठी विविध राज्यातील भाविक परळीत दाखल झालेले आहेत.


तृतीयदिनी कथावक्त्यांनी बेलपत्राचा महिमा विशद केला.बेलपत्र हे भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे.आपले मन शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही.भगवंताला नित्य जलाभिषेक करा याचे फळ तुम्हाला कुठे ना कुठे तरी मिळणारच आहे.काही झाले नाही तर एक लोटा जल महादेवाला दररोज वाहत जावे.याबरोबरच नियमीत संतसेवा करा संतामुळे सत्संग मिळतो असे विवेचन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी कथेत केले.


तृतीय दिनीही गुरुजींनी व्यासपीठावरून शिवभक्तांनी पाठवलेल्या पत्र वाचन केले.

कथा स्थळी शकंर पार्वती झाकी ने उपस्थितीतांना साक्षात भगवंताच्या दर्शनाची अनुभूती आली.आरतीने तृतीय दिन कथेची सांगता झाली,यावेळी मुख्य यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांच्या परिवारासमवेत

माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आरती केली.कथेचे श्रवण करण्यासाठी आज मंडपात भाविकांनी तुडूंब गर्दी केली होती.

- प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत जन्म होणे ही महादेवाची साक्षात कृपा -


गेले तीन दिवस मी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या परळीत आहे. इथे जन्माला येणे म्हणजे साक्षात महादेवाची कृपा असे म्हणावे लागेल.शिवाय महादेव ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात असलेल्या गावात आपले सासर असणेही भाग्याचे लक्षण आहे.असे आवाहन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी करत परळी वैद्यनाथ भूमीचा महिमा विशद केला.

---------------------------------------------------------

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

■ VIDEO News ■

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या