पोस्ट्स

MB NEWS:महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

इमेज
  महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी  परळी वैजनाथ दि.31 (प्रतिनिधी) परळी परिसरात महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शनिवारी (ता.31) लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची ३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वप्रथम संस्थेचे सचिव रविंद्र देशमुख यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांनी आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी या दोन्ही महान हस्तींना मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पी.व्ही.गुट्टे यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.       भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेकडो संस्थानांमध्ये खंडित असलेल्या भारताला एकसंध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हैदराबाद संस्...

MB NEWS:गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशी

इमेज
  गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशी  प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी साजरी परळी (प्रतिनीधी) प्रभाग क्र.पाच चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी आपल्या प्रभागात नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरु केलेले संपर्क कार्यालय हे नागरीकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक केंद्र ठरणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी यांनी केले.प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम व शितल चांदण्यात दुध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. संत सावतामाळी मंदिर परिसरात तुळजाभवानी मंदिर समोर प्रभाग क्र.5 चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्या संपर्क कार्यालयाचे काल दि.30 ऑक्टोबर रोजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी यांच्या हस्ते व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकूमार ठक्कर, माजी उपनगराध्यक्ष आय्युब पठाण,माजी सभापती विजय भोयटे,जनक्रांती संघटनेचे नेते सचिन लगड,पञकार धिरज जंगले, अनंत कुलकर्णी,रायुकॉचे रामदास कराड, बळीराम नागरगोजे यांच्या उपस्थितीत...

MB NEWS:बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद - धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली

इमेज
  बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद - धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली *बापूंच्या आठवणींना मुंडेंनी दिला उजाळा* मुंबई (दि. ३१) ---- : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे; अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी प्राप्त होती. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी - परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला.  ना. मुंडे यांनी डॉ. रामराव बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराजांना वाशीम येथील पोहरादेवी तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद ...

MB NEWS:सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

इमेज
  सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण पंकजाताई  मुंडे यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत मुंबई दि. ३१ ---- २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून देशातील ३१ सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत करून केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.   सुरक्षा मंत्रालयांतर्गत कार्यरत सिव्हील स्कूल सोसायटी देशातील निवासी सैनिकी शाळा चालवत आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी  काल ट्विट करत ही माहिती दिली ते म्हणाले की,सन २०२१-२२ पासून सैनिक शाळांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाणार आहे. १३ ऑक्टोबरला एक परिपत्रक देशातील सर्व सैनिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले. या परिपत्रकात नमूद केले आहे की, सैनिक शाळांमधील ६७ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. या परिपत्रकात असे म्हटले आहे की प्रत्येक यादीतील १५ टक्के जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, तर...

MB NEWS:संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला- पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

इमेज
  संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला  पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना मुंबई दि. ३१ ----- आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या निधनाने देश एका महान तपस्वीला मुकला आहे, त्यांचे विचार व सर्व सामान्य लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहतील अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.     समस्त बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पोहरादेवी संस्थानचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या निधनाची बातमी समजली आणि धक्काच बसला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब दरवर्षी पोहरादेवीला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत असत, तीच परंपरा मी पुढे जपली. त्यांचे विचार आणि तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील, त्यांच्या निधनाने देश  एका महान तपस्वीला मुकला आहे अशा शब्दांत आपल्या शोक भावना व्यक्त करून पंकजाताई मुंडे यांनी  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  ••••

MB NEWS:परळी, अंबाजोगाई, केज सह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश

इमेज
परळी, अंबाजोगाई, केज सह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश बीड (दि. ३०) ---- : बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई , केज व आष्टी तालुक्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने फेर पंचनामे करून सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला असून, त्यामध्ये परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी तालुक्यांचा ३३% पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल निरंक असल्याच्या बातम्या काही दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याने धनंजय मुंडे यांनी तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश दिले आहेत.  नुकताच ना मुंडे यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द ना. मुंडेंनी राज्य शासनाच्या वतीने दिला होता.  राज्य शासनाने घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या पॅके...

MB NEWS:बीड जिल्हयात मनाई आदेशांना ३० नोव्हेंबर पर्यंत वाढ* *--जिल्हाधिकारी राहूल रेखावार

इमेज
  बीड जिल्हयात मनाई आदेशांना ३० नोव्हेंबर पर्यंत वाढ --जिल्हाधिकारी राहूल रेखावार  बीड, दि,३० :- (जि.मा.का.) राज्य शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीत दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामूळे बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये जे आदेश लागू आहेत त्या सर्व मनाई आदेशात वाढ करण्यात येत असून ते दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले.      जिल्ह्यात यापूर्वी सदर कलमान्वये दिनांक 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत त्यात वाढ होऊन दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील.  राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुण खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पो...