प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:परळी, अंबाजोगाई, केज सह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश



परळी, अंबाजोगाई, केज सह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश



बीड (दि. ३०) ---- : बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई , केज व आष्टी तालुक्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने फेर पंचनामे करून सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.


बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला असून, त्यामध्ये परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी तालुक्यांचा ३३% पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल निरंक असल्याच्या बातम्या काही दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याने धनंजय मुंडे यांनी तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश दिले आहेत. 


नुकताच ना मुंडे यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द ना. मुंडेंनी राज्य शासनाच्या वतीने दिला होता. 


राज्य शासनाने घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाने केलेले हे पंचांनामे महत्वाचे ठरणार आहेत. या पंचनाम्यांमध्ये मानवी दोष असून, त्यामुळेच तीन तालुक्यातील ३३% पेक्षा जास्त नुकसानीचा अहवाल निरंक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची हयगय न करता तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले असून, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी आश्वस्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या