पोस्ट्स

MB NEWS: गेवराई,अतिवृष्टीची मदत देताना पक्षपातीपणा का..??-पूजा मोरे

इमेज
  अतिवृष्टीची मदत देताना पक्षपातीपणा का..??-पूजा मोरे गेवराई, प्रतिनिधी... बीड जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यात गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मंत्र्यांचे पाहणी दौरे याच भागात झाले.परंतु मंत्र्यांनी पाहणी केलेले मादळमोही व तलवाडा हे महसूल मंडळ अतिवृष्टीतुन वगळण्यात आले आहे.त्यामुळे मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो पुरते होते का ?असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील 118 गावातील एक लाख 16 हजार 865 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर एकूण 90 हजार 730 हेक्‍टर जिरायती क्षेत्रातील पिकांचे तर बागायती क्षेत्रातील 556 हेक्‍टरवर नुकसान झाले तसेच 87 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले जिल्ह्यात एकूण 90 हजार 3376 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.तर सोयाबीन,बाजरी, तूर, कापूस, ऊस, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुसार शासनाने अतिवृष्टीचे 10,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले परंतु ज्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही व तलवाडा या भागात डझनभर मंत्र्यांनी पाहणी दौर...

MB NEWS:परळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

इमेज
  परळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार   परळी : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१२) उघडकीस आली. या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी ४ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता शौचासाठी घराबाहेर आली होती. यावेळी किरण रावसाहेब राठोड याने तिला इकडे ये म्हणत बोलावून घेतले व त्यानंतर तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने गुरुवारी परळी ग्रामीण ठाणे गाठून फिर्याद दिली.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

MB NEWS:कोरोनाचे संकट दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात हरवून एक नवीन आशादायी सोनेरी पहाट प्रकाशमान व्हावी -धनंजय मुंडे*

इमेज
 * कोरोनाचे संकट दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात हरवून एक नवीन आशादायी सोनेरी पहाट प्रकाशमान व्हावी -धनंजय मुंडे*   *दिपावली निमित्त जिल्हा वासीयांना दिल्या शुभेच्छा* परळी वै. (दि. १३) ---- : दिपावलीचा सण आनंद व दीपोत्सवाचे पर्व असून या निमित्त सर्वांच्या आयुष्यात सुख, समृध्दी आणि आरोग्याचा प्रकाश तेजोमय व्हावा; जगावरील कोरोनारुपी संकट दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात हरवून जावे आणि एक नवीन आशादायी सोनेरी पहाट सर्वांच्या आयुष्यात प्रकाशमान व्हावी, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना व राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरी देवता प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्यसंपन्नता प्रदान करो, लक्ष्मी पुजनानिमित्त समृध्दी आणि भरभराटीने प्रत्येकाचे कौटूंबीक आयुष्य आनंदमयी व्हावे, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या गोडव्याच्या माध्यमातून कौटूंबीक व सामाजिक स्नेहसंबंध वृध्दिंगत व्हावेत तसेच दीपावलीचा आनंद स्नेह व सामाजिक ऐक्य रुजवणारा ठरावा अशी आशा ना.मुंडे यांनी आपल्या शु...

MB NEWS:रेल्वेतून ज्वालाग्रही साहित्य वाहतूक होऊ नये यासाठी परळी रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम

इमेज
  रेल्वेतून ज्वालाग्रही साहित्य वाहतूक होऊ नये यासाठी परळी रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम   परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        रेल्वे गाड्यांमधुन ज्वालाग्रही साहित्य घेऊन जाण्यास निर्बंध आहेत.रेल्वेतून ज्वालाग्रही साहित्य वाहतूक होऊ नये यासाठी परळी रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.      अग्नि क्रॅकर्स  ट्रेनमध्ये नेण्याविरूद्ध विशेष तपासणी करण्यात आली. आयपीएफ / पीआरएलआय कर्मचार्‍यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ट्रेनची तपासणी केली. तसेच प्रवाशांना ट्रेनमध्ये फटाके / ज्वालाग्राही वस्तू न ठेवण्याचे प्रशिक्षण दिले. परळी आरपीएफचे अधिकारी मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना ज्वालाग्रही साहित्य बाळगू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

MB NEWS:परळी शहरच्या तत्पर डिबी पथकाची दमदार कामगिरी: १२ तासाच्या आत २५ लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला शोधून ठोकल्या बेड्या

इमेज
  परळी शहरच्या तत्पर डिबी पथकाची दमदार कामगिरी: १२ तासाच्या आत २५ लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला शोधून ठोकल्या बेड्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...       परळी शहर पोलिस ठाण्याच्या तत्पर डिबी पथकाने दमदार कामगिरी बजावली असून काल परळीच्या मोंढा परिसरात घडलेल्या खळबळजनक घटनेचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. डिबी पथकाने१२ तासाच्या आत २५ लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला शोधून बेड्या ठोकल्या आहेत. परळी पोलिसांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.    औरंगाबादच्या व्यापार्‍याने वसुली करून आणलेले २५ लाख रुपये चारचाकी गाडीमध्ये ठेवले होते. अन्य वसुली करण्यासाठी ते गेले होते. गाडीत चालक होता मात्र चालकाने पैसे सोबत न नेता पैसे गाडीत ठेवून तो समोसे आणण्यासाठी गेला. तितक्यात चोरट्यांनी गाडीतील २५ लाख रुपये लांबविले. संजय गंगावले हे औरंगाबादचे व्यापारी अंबाजोगाईहून परळीला वसुलीसाठी आले होते. आतापर्यंतचे वसुलीचे पैसे जवळपास २५ लाख रुपये त्यांनी गाडीमध्ये ठेवले आणि इतर ठिकाणची वसुली करण्यासाठी ते परळी शहरामध्ये गेले होते. गाडीत चालक होता. चालक पैसे गाडीत ठेवून समोसे आण्या...

MB NEWS:बीड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर 1३ नोव्हेंबर 2020 धनत्रयोदशी निमित्त सुट्टी

इमेज
  बीड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर 1३ नोव्हेंबर 2020 धनत्रयोदशी निमित्त सुट्टी बीड.... बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत यामध्ये दीपावली मधील धनत्रयोदशी ची सुट्टी आता मिळणार आहे यावर्षी धनत्रयोदशी 13 तारखेला असून णि कुटी'मध्‍ये याचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे रक्षाबंधन व ज्येष्ठा गौरी पूजन या सुट्ट्यांचा ह समावेश आहे सण 20 20 या वर्षासाठी या स्थानिक सुट्या जाहीर करण्यात आले आहेत.

MB NEWS: स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ना.धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन

इमेज
  स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ना.धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त (वसुबारस) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.. यावेळी ना.मुंडे यांनी स्व. पंडित अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.