इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:परळी शहरच्या तत्पर डिबी पथकाची दमदार कामगिरी: १२ तासाच्या आत २५ लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला शोधून ठोकल्या बेड्या

 परळी शहरच्या तत्पर डिबी पथकाची दमदार कामगिरी: १२ तासाच्या आत २५ लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला शोधून ठोकल्या बेड्या




परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

     परळी शहर पोलिस ठाण्याच्या तत्पर डिबी पथकाने दमदार कामगिरी बजावली असून काल परळीच्या मोंढा परिसरात घडलेल्या खळबळजनक घटनेचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. डिबी पथकाने१२ तासाच्या आत २५ लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला शोधून बेड्या ठोकल्या आहेत. परळी पोलिसांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.

   औरंगाबादच्या व्यापार्‍याने वसुली करून आणलेले २५ लाख रुपये चारचाकी गाडीमध्ये ठेवले होते. अन्य वसुली करण्यासाठी ते गेले होते. गाडीत चालक होता मात्र चालकाने पैसे सोबत न नेता पैसे गाडीत ठेवून तो समोसे आणण्यासाठी गेला. तितक्यात चोरट्यांनी गाडीतील २५ लाख रुपये लांबविले. संजय गंगावले हे औरंगाबादचे व्यापारी अंबाजोगाईहून परळीला वसुलीसाठी आले होते. आतापर्यंतचे वसुलीचे पैसे जवळपास २५ लाख रुपये त्यांनी गाडीमध्ये ठेवले आणि इतर ठिकाणची वसुली करण्यासाठी ते परळी शहरामध्ये गेले होते. गाडीत चालक होता. चालक पैसे गाडीत ठेवून समोसे आण्यासाठी गेला. तितक्यात चोरट्यांनी डाव साधत गाडीतील २५ लाख रुपये पळविले. परत आल्यानंतर पैसे चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची माहिती परळी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 



    या घटनेमुळे व्यापारपेठेत मोठी खळबळ उडाली होती.परळी शहर पोलिसांनी गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन शोध सुरू केला.परळी शहर पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने तातडीने तपासकार्यात अग्रेसर होऊन आरोपींचा मागमुस शोधला.गुप्त माहिती अधारे आरोपी शोधून वैजापूर जि.औरंगाबाद येथून दोन आरोपी,२४ लाख ८ हजार रोख रक्कम व एक स्विफ्ट कार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

     पोलीस अधिक्षक आर.राजा, उपविभागीय पोलिस अधिकारी जायभाये, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे भास्कर केंद्रे, सुंदर केंद्रे, गोविंद भताने, शंकर बुट्टे, आदींनी ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....