MB NEWS:परळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 परळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार



 

परळी : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१२) उघडकीस आली. या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद झाला.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी ४ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता शौचासाठी घराबाहेर आली होती. यावेळी किरण रावसाहेब राठोड याने तिला इकडे ये म्हणत बोलावून घेतले व त्यानंतर तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने गुरुवारी परळी ग्रामीण ठाणे गाठून फिर्याद दिली.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !