पोस्ट्स

MB NEWS- गंगाखेड, बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला 178 लक्ष रुपये विकास निधी

इमेज
  बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला 178 लक्ष रुपये विकास निधी   ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 मध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीस मतदान संख्येनुसार निधी देण्याची आमदार गुट्टे यांनी केली होती घोषणा पालम येथे पार पडलेल्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बिनविरोध ग्रामपंचायतीस केले निधीचे वाटप गंगाखेड/प्रतिनिधी:          ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीस आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी गावातील मतदान संख्येनुसार प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून विकास निधी घोषित केला होता. बिनविरोध ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर बक्षीस विकास निधीचा पहिल्या टप्प्याचे वितरण पालम येथे घेण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये करण्यात आले.         ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2020 21 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील एकूण 187 ग्रामपंचायती निवडणूका होऊ घातल्या होत्या यापैकी 25 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. यामध्ये गंगाखेड ...

औ. प्र. संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील यांना पितृशोक

इमेज
  औ. प्र. संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील यांना पितृशोक परळी वैजनाथ दि २० ( प्रतिनिधी ) :- येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील सर यांचे वडील शेख मोहम्मद हुसेन शेख यासीन ( वय‌ ९० ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.  परळी नगर परिषदेमध्ये जवळपास ४२ वर्ष परळीकरांची सेवा करून यशस्वीरित्या सामाजिक जबाबदारी पार पाडणारे तथा परळी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य शेख खलील सर यांचे वडील शेख मोहम्मद हुसेन शेख यासीन राहणार मलिकपुरा परळी वैजनाथ यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच परिसरात आणि नगरपरिषद परिसरात शोककळा पसरून हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या पश्चात शेख खलील, शेख वहाब, शेख खैसर, शेख झाकेर, शेख जावेद, शेख जमील अशी सहा मुले व एक मुलगी, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार असून शेख यासीन, शेख इम्तेहाज, शेख अखिल यांचे ते आजोबा होते. मयत शेख मोहम्मद हुसेन यांचेवर मलिकपुरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. माजी प्राचार्य शेख खलील सर आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात  एमबी न्युज परिवार सहभागी आहे. ----------------...

MB NEWS-कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची होणार अंमलबजावणी असे आहेत...... जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आदेश,निर्देश.

इमेज
  कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची होणार अंमलबजावणी असे आहेत...... जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आदेश,निर्देश. बीड, प्रतिनिधी.... 1. सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषदानगरपंचायत यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/विद्यालय, महाविद्यालय, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मीक स्थळे, उद्याने व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. सदर ठिकाणी प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) मधील मर्यादेपेक्षा जास्त संख्येत लोक उपस्थित असतील, उपस्थित लोकांनी चेह-यावर मास्क परिधान केलेले नसतील, हँड सॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल, त्यांना प्रथम वेळी नोटीस देऊन उचित दंड आकारावा. नोटीस देताना पुढील तपासणीत हीच परिस्थिती राहिली तर गुन्हा दाखल करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख नोटीस मध्ये करावा. त्याच ठिकाणी दुसऱ्या वेळेस जर अशीच परिस्...

MB NEWS- *कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा-प्रा.अतुल दुबे*

इमेज
 *कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा-प्रा.अतुल दुबे*      परळी वैजनाथ कोरोना विषयी सर्वत्र निष्काळजी पण होत असुन या मुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ती रोखण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करा असे आवाहन विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे त्यांनी केले आहे. राज्यात कांही दिवसा पूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती.मात्र कोरोना विषयी सर्वत्र लोकांमध्ये निष्काळजी पण दिसुन येत आहे या निष्काळजी पणा मुळे कमी झालेली रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. सार्वजनिक कार्यक्रम,विवाह सोहळा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असलेली गर्दी आणि या गर्दीत योग्य अंतर न ठेवणे,मास्क न वापरता होत असलेला लोकांचा सहभाग या मुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे ही वाढ रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करा असे आवाहन भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी केले आहे.

MB NEWS-समाजाला नवी दिशा नवा विचार देण्याचे कार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केले-सतीश बियाणी* *अ.भा.मराठी पत्रकार परिषद परळीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी*

इमेज
 * समाजाला नवी दिशा नवा विचार देण्याचे कार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केले-सतीश बियाणी* *अ.भा.मराठी पत्रकार परिषद परळीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी*  परळी, (प्रतिनिधी):- आद्य पत्रकार दर्पणकार, मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा व नवा विचार देण्याचे कार्य केले. आपल्या अलौकिक प्रतिभेने नवा विचार, नवी दिशा घेऊन आपले कार्य सुरू केले. मराठी वृत्तपत्रीय पत्रकारितेची मुहूर्तमेढ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली. असे प्रतिपादन मराठवाडा साथी चे संपादक तथा आ.भा.मराठी पत्रकारीषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश बियाणी यांनी केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, शाखा परळी च्या वतीने मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी पीसीएन सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळ...

MB NEWS-परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार - जिल्हाधिकारी यांनी घेतला खबरदारीचा निर्णय

इमेज
  परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार - जिल्हाधिकारी यांनी घेतला खबरदारीचा निर्णय इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग राहतील सुरू…. परभणी, प्रतिनिधी.... परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (दि.20) दिले. दरम्यान, इयत्ता दहावी व बारावी व्यतिरीक्त इतर सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे. परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षणक पॉझिटीव्ह आलेले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी बजावले आहेत. इयत्ता दहावी व बारावीला शिकविणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी नियमित शाळेत...

MB NEWS- *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा- तृप्ती देसाई* • _परळीत येउन घेतली मयत पुजाच्या कुटुंबियांची भेट_ •

इमेज
 *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा- तृप्ती देसाई* • _परळीत येउन घेतली मयत पुजाच्या कुटुंबियांची भेट_ • .      परळी वैजनाथ : एमबी न्युज वृत्तसेवा..   भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज दुपारी परळीमध्ये येऊन मयत पुजा चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली.या भेटीनंतर बोलताना तृप्ती देसाई यांनी पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली आहे.पूजाच्या मृत्यूचे सत्य बाहेर आले पाहिजे, तिला न्याय मिळायला हवा. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.          परळी येथील वसंतनगर तांडा येथे पूजा चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या भेटी दरम्यान आज शनिवारी(दि.२०) दुपारी त्या बोलत होत्या. पूजा चव्हाणच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. आज दुपारी भूमाता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट देऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत अ...