पोस्ट्स

MB NEWS-एसआयओ व जमाते इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

इमेज
  एसआयओ व जमाते इस्लामी हिंद  यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबीर परळी वै.( प्रतिनिधी) दि. 10 एप्रिल 2021: महाराष्ट्रावर असलेले रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन जमाते ईस्लामि हिंद कार्यालय आझादनगर परळी वैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास एसआयओचे महाराष्ट्र साऊथ झोन प्रमुख सलमान खान साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबिरास तरूण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसआयओ व जमाते इस्लामि हिंद या  सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात  रक्तदान शिबीरांच्या आयोजनांचे सत्र सुरू आहे. सामान्य जनतेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. लसीकरणा बाबत जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती याप्रसंगी बोलताना सलमान खान यांनी दिली. आपल्या संदेशात पवित्र कुरआन चा दाखला देत ते म्हणाले,"तुम्ही एका मानवाला वाचवले, तर तुम्हाला संपुर्ण मानवजातीला वाचवल्याचे पुण्य लाभते." राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आव...

MB NEWS- *आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश :ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर*

इमेज
 *आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश :ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर झाली आहे.       प्रभाग क्रमांक दोन मधील शिवनगर, भिमानगर, झमझमपार्क,  बरकत नगर भागात  प्रभाग क्र 2 मध्ये आंगणवाडी मंजुर करण्यात आली आहे.  माजी उपनगराध्यक्ष आयुबखान पठाण यांच्या प्रयत्नातुन या अंगणवाडी ला मंजुरी मिळाली आहे.गेल्या अनेक दिवसापासून या भागात अंगणवाडी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. या भागातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,न.प.गटनेते वाल्मि...

MB NEWS-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवाद कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी-मोहन व्हावळे*

इमेज
 * भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी-मोहन व्हावळे*  _परळी / प्रतिनिधी_  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात  शहर व गावपातळीच्या प्रत्येक कुटुंबात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते.14 एप्रिल हा दिवस बहुजनांना प्रेरणा देणारा दिवस आहे.चालु असलेल्या लाॕकडाऊन मध्ये शिथिलता देऊन बाबांच्या अभिवादन करण्यासाठी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व प्रत्येक वस्तीत असलेल्या  बौध्द विहारात ध्वजारोहण,पुजापाठ करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी व साहित्य खरेदी करीता किमान दोन दिवस बाजार खुला करावा अशी मागणी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे संपादक मोहन व्हावळे यांनी केली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घराघरात उत्साहचे वातावरण असते व जयंतीच्या निमित्ताने घराघरात रंगरंगोटी, नवीन कपडे, सजावटीचे सामान, मिठाई, इतर पदार्थांची बनवले जातात त्यामुळे  व्यापार पेठही चालू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढाव्यात अशी विनंती बीड जिल्हाधिकारी यांना केली आहे.निश्चितच आपण जर परवानग...

MB NEWS-कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न पडले महागात: नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल

इमेज
  कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न पडले महागात: नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे  वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल        नेकनूर,प्रतिनिधी....      कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न समारंभ करणं महागात पडले आहे. राज्यात कोविडविषयक कडक निर्बंध लागू आहेत. जमावबंदी, संचारबंदी लागू आहे.या परिस्थितीत ही गर्दी जमवुन लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रकरणी नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे  वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           धारूर आणि पैठण येथील कुटुंबीयांनी  विवाहासाठी  मांजरसुंबा हे  ठिकाण निवडले होते. मांजरसुंबा येथील बीड रोड वर असणाऱ्या कन्हैया लॉन्स या ठिकाणी मोठ्या  प्रमाणात गर्दी झाल्याचे नेकनूर पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. या ठिकाणी धारूर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होत असल्याने गर्दी दिसून आली. यामुळे साथरोग, आपत्ती व्यवस्थापन आदी कलमाचे उल्लंघन झाल्याने ग्रामसेवक जगदीश कडू यांच्या फिर्यादी...

MB NEWS-सभापती गोपाळ आंधळे यांच्या पाठपुराव्याला यश न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय

इमेज
सभापती गोपाळ आंधळे यांच्या पाठपुराव्याला यश  न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने  प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय   परळी दि. ७(प्रतिनिधी)सध्या परळी शहरात कोरोनांची दुसरी लाट रौद्ररूप घेत असुन दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी केले आहे. त्याअनुषंगाने नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी न.प. गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या कडे प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे साहेब यांना सुचना केली. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून या आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे केली आहे.  सध्या परळी शहरात केवळ उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. परंतु शहराची लोकसंख्या लक्षात घेता हे लसीकरण केंद्र वाढवणे ग...

MB NEWS-सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची थकीत देयके परळी पालिकेने त्वरित द्यावीत-नगरसेवक प्रा.पवन मुंडे

इमेज
  सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची थकीत देयके परळी पालिकेने त्वरित  द्यावीत-नगरसेवक प्रा.पवन मुंडे ---------------- परळी वैजनाथ, दि.  (प्रतिनिधी)ः- परळी नगर पालिकेत सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचे पालिकेकडून येणे असलेली विविध देयके त्वरित देवून या कर्मचार्‍यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केली आहे. पालिका कार्यालयात दिलेल्या निवेदनात प्रा.मुंडे यांनी ही मागणी केली आहे. आयुष्यभर पालिकेत सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची सेवानिवृत्तीनंतर परळी पालिका प्रशासनाने हेळसांड लावली आहे. सेवानिवृत्त होवून अनेक महिने जावूनही या कर्मचार्‍यांना पालिकेकडून येणे असलेले भविष्य निर्वाह निधी व इतर देयके वेळेवर दिली जात नाहीत. कर्मचारी सतत यासाठी पालिका कार्यालयात चकरा मारत असतात. गेल्या कांही वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना पालिकेने अद्याप ही देयके दिलेली नाहीत. पालिका प्रशासनाने यात लक्ष घालून ही देयके त्वरित अदा करावीत अशी मागणी प्रा.मुंडे यांनी या निवेदनात केली आहे.

MB NEWS-दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक; प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडे* *पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंडेंचे जिल्हावासीयांना आवाहन*

इमेज
 * दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक; प्रशासनाला सहकार्य करा - धनंजय मुंडे* *पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंडेंचे जिल्हावासीयांना आवाहन* परळी (दि. ०७) ---- : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून, मंगळवारी एकाच दिवसात हे आकडे ७०० च्या पार गेलेले पाहायला मिळाले. दिवसागणिक वाढणारे हे आकडे चिंताजनक असून याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.   जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकरात लसीकरण करून घ्यावे; ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पूर्ण केली आहे, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत असे आवाहन जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.  बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची आकडेवारी मोठ्या वेगाने वाढत आहे. ही रुग्णासंख्या विचारात घेतली असता ऑक्सि...