पोस्ट्स

MB NEWS-गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे*

इमेज
 * गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे* परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)           तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे यांची निवड करण्यात आली असून सोसायटीचे चेअरमन पांडुरंग गंगणे व प्रमुख मार्गदर्शक युवानेते शरद राडकर यांनी अभिनंदन केले आहे.                       गाढे पिंपळगाव येथील सेलू, सफदाराबाद व गाढे पिंपळगाव या तीन गावची मिळून सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षापूर्वी सोसायटीच्या निवडणूका झाल्या असून निवडणुकीत ठरल्या प्रमाणे श्री.आरसुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब आरसुळे यांचा शरद राडकर, चेअरमन पांडुरंग गंगणे, शितलदास आरसुळे यांनी सत्कार केला. या नियुक्ती बदल सोसायटीचे मार्गदर्शक युवानेते शरद राडकर, चेअरमन पांडूरंग गंगणे, संचालक प्रशांत थोंटे, गणेश फुटके, जालिंदर राडकर, शितलदास आरसुळे, सुंदर नवले यांच्यासह सर्व संचालक, सभासदांनी...

MB NEWS-वीज बंद काळातील कृषी विजपंप बिल माफ करण्याची मागणी* *राज्य किसान सभेच्या पदाधिकारी यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली मागणी*

इमेज
 , * वीज बंद काळातील कृषी विजपंप बिल माफ करण्याची मागणी* *राज्य किसान सभेच्या पदाधिकारी यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली मागणी* *परळी वै : दि 11 प्रतिनिधी* परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण प्रकल्पावर अवलंबुन असलेल्या कृषी पंप धारकांना सण 2015 ते 20 या सहा वर्षाचे नाहक वीज बिल शेतकऱ्यांना देण्यात आले असून या काळात ह्या धरणातील पाणी साठा हा फक्त पिण्यासाठी आरक्षीत केला असतानाही कृषी पंपाचा वापर न करता शेतकऱ्यांना या सहा वर्षाच्या वीज वापराचे बिल देण्यात आल्याने हे कृषी वीज देयक माफ करावे अशी मागणी जिल्हा किसान सभेच्या वतीने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भेट घेऊन निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित शिष्टमंडळाशी चर्चा करून याबाबतीत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागास उर्जामंत्र्यांनी दिले आहेत. सण 2015 मध्ये वान प्रकल्प ता. परळी येथील प्रकल्पातील पाणी तत्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर साहेब यांच्या आदेशाने पिण्यासाठी पाणी सन २०१५ मध्ये आरक्षित करण्यात आले होते. तेव्हापासून ते डिसेम्बर २०२० पर्यंत प्रकल्पात पाणी उपलब्ध नसल्याने प्रकल्पावरील विजेचे सर्व ट्रा...

MB NEWS- *मोहा येथील दृष्टीहीन अक्षय कोकाटेला अन्नपूर्णा चॅरिटेबलचा मदतीचा हात* *_नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी घेतला पुढाकार_*

इमेज
 *मोहा येथील दृष्टीहीन अक्षय कोकाटेला अन्नपूर्णा चॅरिटेबलचा मदतीचा हात* *_नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी घेतला पुढाकार_* परळी । प्रतिनिधी माणसाला पाच ज्ञानेंद्रीय नैसर्गिकरित्या असतात. याद्वारे जन्माला आल्यानंतर तो प्रत्येक गोष्ट एक एक करून शिकत असतो. परंतू त्यापैकी कोणताही एक अवयव निकामी असेल तर? तर मात्र त्याचे ते अपंगत्व त्याच्यावर ओझे होऊन बसते. परंतू काही माणसं मात्र आलेल्या कोणत्याही संकटांवर मात करण्याचा गुण जन्मत:च घेवून आलेली असतात की काय? असे वाटायला कारणीभूत आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणे असतात. परळी तालुक्यातील मोहा येथे जन्मलेल्या अक्षय प्रल्हाद कोकाटे हा मुलगा असाच इतरांसाठी मूर्तीमंत उदाहरण ठरतोय. जन्मापासून त्याला दृष्टी नाही. सृष्टी म्हणजे काय असते हे अजूनही त्याने पाहीले नाही, परंतू तो यंदा आपल्या जिद्दीवर ईयत्ता दहावीची परिक्षा देतोय. परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने यासाठी मदत मागीतली आणि त्याच्या मदतीला परळीची अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट धावून आली. तालुक्यातील मौजे मोहा येथील अक्षय प्रल्हाद कोकाटे हा विद्यार्थी जन्मत:च अंध आहे. काही दिवसांपूर्वी त्याने तहसिलदा...

MB NEWS-वॉर्ड क्रमांक १३ मधील कामासाठी सदैव तत्पर राहणार - गणेश वाळके

इमेज
  वॉर्ड क्रमांक १३ मधील कामासाठी सदैव तत्पर राहणार - गणेश वाळके परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वॉर्ड क्रमांक १३ मधील बाजीप्रभू नगर ( पंचवटी नगर ) मधील चेंबर चे काम चालू असल्यामुळे रोड वर जमा झालेल्या मातीमुळे पावसात चिखल झाला आहे, या चिखला मुळे  नागरिकांना  चिखलाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.  येथील नागरीक खूप त्रासले असून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाळके यांना  कळविले व यावर काही तरी तोडगा काढण्यास सांगितले त्यावेळेस गणेश वाळके यांनी तात्पुपूर्ता मुरूम टाकून घेऊ असा शब्द दिला व ते काम पूर्ण केले त्यांच्या या कामाने बाजीप्रभू नगर व ( पंचवटी नगर ) नव्हे तर संपूर्ण वॉर्ड त्यांच्या या कामाचे कौतुक करत आहेत. आपल्या वॉर्ड मधील कामासाठी मी सदैव तत्पर राहणार असे यावेळी बोलताना गणेश वाळके म्हणाले

MB NEWS- *ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे परळीत रा.काॅं.च्या वतीने ह्रदय स्वागत*

इमेज
 ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे परळीत रा.काॅं.च्या वतीने ह्रदय स्वागत परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     राज्याचे उर्जा मंत्री ना.नितिन राउत हे  बीड जिल्हा दौ-यावर आलेले असताना परळीमध्ये त्यांचे विविध संघटना, संस्था, कार्यकर्ते यांनी स्वागत केले.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने ही त्यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले.         राज्याचे उर्जा मंत्री ना.नितिन राउत  हे परळीमध्ये आले असताना त्यांचे  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संजय दौण्ड, नगर परिषद गटनेते वाल्मीक कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, सरचिटणीस अनंत इंगळे,ज्येष्ठनेते माधव ताटे,भीमराव डावरे, प्रा.शाम दासूद,रवि मुळे, सुभाष वाघमारे,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

MB NEWS-पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी बालासाहेब पोरे

इमेज
पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी बालासाहेब पोरे  परळी वैजनाथ, प्रतिनिधी परळी शहरातील अल्पावधीत नावरुपास आलेल्या पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी परळी शहरातील सर्व सामान्य माणसाच्या कामात सतत मदत करणारे मा.श्री.बालासाहेब पोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत ,उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे, सचिव गोविंद भरबडे, संचालक बालासाहेब घवले, जेष्ठ पत्रकार पदमाकर भंडारे आदी उपस्थित होते.

MB NEWS-छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांच्या वतीने कोरोनाने मयत कुटुंबाना आर्थिक मदत

इमेज
 * छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांच्या वतीने कोरोनाने मयत कुटुंबाना आर्थिक मदत  परळी वैजनाथ ------  छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांनी स्वनिधी म्हणुन कोरोनाने मयत नालंदा विद्यार्थी वसतिगृह परळी चे अधिक्षक प्रमोद जगतकर यांच्या कुटुंबीयांना 5000/- पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांना सर्वोतपरी मदत करण्याचें जाहीर केले. जगतकर कुटुंबात आज आर्थिक मदत देताना जिल्हा अध्यक्ष श्रीराम सारुक, जिल्हा सचिव उत्त्तम साबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन रणखांबे,केज/धारुर ता अध्यक्ष जुबेर इनामदार,ता.सचिव अभिजित लांडगे.महिला जिल्हा अध्यक्ष वनमाला जगतकर, वडवणी ता अध्यक्ष दिनकर बडे,क्रांती लांडगे आदि वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते.या प्रसंगी किसन देव नागरगोजे यांनी महाराष्ट्रातील जे वसतिगृह कर्मचारी कोरोनाने मयत झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांनाही प्रत्येकी 5000/-रू स्वनिधी आर्थिक मदत म्हणुन देणार असल्याचे सांगितले.व सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत असलेल्या निधीतून कोरोनाने मयत झालेल्य...