MB NEWS-देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली 🕳️ *संत जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रृंगारपुजा

देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली 🕳️ *संत जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रृंगारपुजा परळी वैजनाथ, प्रतिनिधी .. देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली असल्याचे पहावयास मिळाले.त्याचप्रमाणे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात काही दिंड्याही वैद्यनाथ नगरीत दाखल झाल्या होत्या. एकादशी म्हटलं की परळीचा मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातो. वैद्यनाथ मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर आदींसह शहरातील मंदिरात दर्शनासाठी परळीत पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात.पण सध्या या देउळबंद अवस्थेत मंदिरांची दारं बंद असल्याने भाविकांची श्रद्धा पायरीला दर्शन घेऊन वाहिली जात आहे.आज वैद्यनाथ मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, विठ्ठल मंदिर अंबेवेस, जाजुवाडी विठ्ठल मंदिर आदी परिसरात हे चित्र बघायला मिळाले. या देऊळ बंद ने अनेक समस्या उभ्या केल्यात देवस्थानावरील अवलंबून असलेली छोटी मोठी व्यवसाय करणारी शेकडो शेकडो लोकांची घरे आता ...