पोस्ट्स

MB NEWS-ना.धनंजय मुंडे व सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बचतगट बळकटीकरण विशेष योजना ! परळीमधील महिला बचतगटांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी"

इमेज
  ना.धनंजय मुंडे व सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बचतगट बळकटीकरण विशेष योजना !   परळीमधील महिला बचतगटांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी" परळी वैजनाथ, प्रतिनिधी......          राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषद गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नातून परळीमधील सर्व बचतगटांना "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी" योजना सुरू करण्यात येणार आहे.या अंतर्गत प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे वार्षिक 4% व्याजदराने पतपुरवठा करण्यात येणार आहे.         नाथ प्रतिष्ठान यांच्यावतीने सदर योजना राबविण्यात येणार आहे.स्वयंसहाय्यता बचतगटांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना निर्माण केली असून याचा सर्व बचतगटांना लाभ मिळणार आहे.याबाबत महिला बचतगटांच्या महिलांची बैठक घेण्यात आली.यावेळीउपस्थित सर्व महिलांना सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा संबोधित क...

MB NEWS-परळीत चोरट्यांना अनलाॅक: चोरट्यांचा थेट एटिएमवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही कॅमेर्याचे नुकसान

इमेज
  परळीत चोरट्यांना अनलाॅक: चोरट्यांचा थेट एटिएमवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही कॅमेर्याचे नुकसान परळी /प्रतिनिधी.....       नाथ चित्रपट मंदिर समोरील एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरे चे नुकसान झाले आहे.शहरातील नाथ चित्र मंदिर समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे या एटीएम चे मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे चे नुकसान करण्यात आले. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आर्थिक नुकसान नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे याचा मागोवा घेतला जात आहे. घटनास्थळी परळी शहर पोलिस चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सपोनि अशोक खरात, पीएसआय मोहन जाधव, भताने, घटमल इतर कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

MB NEWS-महाराष्ट्र बँकेच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्त परळीत उपोषण*

इमेज
 * महाराष्ट्र बँकेच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्त परळीत उपोषण* परळी वैजनाथ....             येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गृहकर्ज जाणीवपूर्वक विलंब करुन टाळाटाळ करत फाईल रिजेक्ट केल्याच्या निषेधार्थ उपोषण करण्यात येत असून शाखाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी खातेदार मंजु वंजारे यांनी केली आहे.  यासंदर्भात उपोषणकर्त्या मंजु नारायण वंजारे यांनी सांगितले की, २३ ऑक्टोबर २०२० रोजी आपल्या शाखेत गृहकर्जासाठी अर्ज केलेला होता, तो आज पर्यंत मंजूर करण्यात आला नाही, उलट दहा महिने विलंबानंतर बँकेच्या अधिकृत पॅनल वरील तीन वकिलांनी सकारात्मक अहवाल दिला असताना अँड. विजय केदार यांनी नकारात्मक अहवाल दिल्याचे कारण पुढे केले आहे. यापूर्वी शहरातील वकीलांनी सर्वे नंबर ४६०६ मधील जागा रजिस्टरीसाठी योग्य असल्याचा अहवाल दिलेला आहे. परंतु अँड विजय केदार यांनी जाणीवपूर्वक नकारात्मक अहवाल दिला. त्याला कसलाही ठोस पुरावा नाही. विजय केदार म्हणतात की प्रॉपर्टी हस्तांतर करण्यास योग्य नाही जर असे असेल तर रजिस्टरी कार्यालयाने ही (खरीदी खत) रजिस्ट्री का करून दिली ? जिल्हाधिक...

MB NEWS- *पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला - पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

इमेज
 *पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला - पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना* परळी दि. ०५ ------  डिग्रस येथील भाजपचे नेते पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने आम्ही उमदे व्यक्तिमत्त्व आणि ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.   मुठाळ यांच्या निधनाची वार्ता समजली, अतीव दुःख झाले. सिरसाळा व परिसरातील शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाने तालुका एका उमद्या व्यक्तीमत्वाला मुकला आहे, त्यांच्या निधनाने कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, अशा शोकभावना व्यक्त करून पंकजाताई यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

MB NEWS-सोन्याची दुकान समजुन फोडली दुसरीच दुकाने; सिरसाळा येथे पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न

इमेज
  सोन्याची दुकान समजुन फोडली दुसरीच दुकाने; सिरसाळा येथे पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न  परळी वैजनाथ, प्रतिनिधी... गावातील मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी(ता.5)पहाटे उघडकीस आला.याबाबत माहिती अशी की गावातील मुख्य रस्त्यावरील वैद्यनाथ स्टील सेंटर,संध्या कन्फेशनरी,आर्या साडी सेंटर,लहूदास ऍग्रो,व महाराष्ट्र ड्रेसेस या पाच दुकानाचे शटर चोरट्यांनी तोडले. दुकानातील दहा हजार रुपये किमतीचे कपडे,व नगदी तीन हजार रुपये लंपास केल्याचे सांगण्यात आले.या चोरट्यांचा मुख्य उद्देश सोन्याचा दुकान फोडण्याचा होता,परंतु सोन्याचे दुकानचे बॅनर पाहून ही दुकाने फोडण्यात आली आहेत. चोरट्यांनी धनश्री ज्वेलर्स या दुकानाचे सीसीटीव्ही तोडून शटर वाकवून दोन कुलपे तोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.या घटनेने बाजारपेठेत खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांनी या चोरट्यांचा तपास करण्याची मागणी होत आहे.

MB NEWS-*ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा होणार शुभारंभ !* *🕳️आजपासून आरोग्य सेवा सप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात*🕳️*

इमेज
  *ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा होणार शुभारंभ !* *🕳️आजपासून आरोग्य सेवा सप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात*🕳️* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        परळी येथील आरोग्य सेवा सप्ताहात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेत्ररोग तपासणी शिबिरात शिफारस करण्यात आलेल्या ५०० रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत असुन आज शुक्रवारपासून (दि.६) आरोग्य सेवासप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात होणार आहे.पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा शुभारंभ होणार आहे.या शस्त्रक्रियेसाठी २० रुग्णांना परळी येथुन रवाना करण्यात आले.               राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे नेत्ररोग तपासणी शि...

MB NEWS-गावभागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा; नागरीकांनी दिले निवेदन

इमेज
गावभागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा; नागरीकांनी दिले निवेदन   परळी वैजनाथ ... शहरातील गणेशपार भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी जुन्या गाव भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांना भेटून निवेदन दिले.  गेल्या काही दिवसापासून गणेशपार भागातील, सावता माळी मंदिर परिसर, नांदूरवेस गल्ली, जंगम गल्ली, अंबेवेस, भिमनगर, साठे नगर, खंडोबा नगर, किर्ती नगर, कृष्णा नगर, तुळजा नगर, गंगासागर नगर, सिध्देश्वर नगर, खुदबे नगर, देशमुख गल्ली, धोकटे गल्ली, बंगला गल्ली आदी भागातील वीज पुरवठा सतत खंडीत केला जात आहे. दिवस भरात किमान वीस ते पंचवीस वेळा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होतो. यामुळे घरातील विद्दुत यंञे खराब होत आहेत. हा प्रकार केवळ शहरातील इतर विभागात लोड येत असल्याने गणेशपार भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. याच बरोबर नव्याने बसवण्यात आलेले ट्रान्स्फार्मर सुरू करावेत या मागणीसाठी आज नागरिकांनी उप कार्यकारी अभियंता प्रशांत आंबडकर व अभियंता कटके यांच्याशी चर्चा करण्यात आली...