पोस्ट्स

MB NEWS- *बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*

इमेज
*बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान* 🔸 _डोळ्यादेखत उभं रान जळताना शेतकर्यांचं ह्रदय तळतळलं_  परळी वैजनाथ( प्रतिनिधी) : तालुक्यातील बोधेगाव येथील शेतात उभ्या असलेल्या उसाला अचानक आग लागली. या आगीत जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांचा पंधरा एकर ऊस जळून खाक झाला.या आगीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बोधेगाव येथे शुक्रवारी (दि.२१) दुपारी सोनहिवरा  रस्त्यावर तळ्याच्या लगत असलेल्या उसाला अचानक आग लागली.        आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली की, या आगीत जवळपास १५ एकर ऊस जाळून खाक झाला आहे. आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतात लागोपाठ शेजारी ऊस लागवड असल्याने एका शेतातील ऊसाला आग लागल्याने ती मोठ्या प्रमाणात पसरली.यामध्ये बबलू राजेभाऊ शिंदे, सुधाकर रामभाऊ शिंदे, दशरथ नारायण शिंदे, बाळासाहेब नारायण शिंदे, मुंजाभाऊ गुणाजी गडदे आदी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागताच गावकऱ्यांनी ती आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेतकऱ्यांना विझवणे शक्य झाले...

MB NEWS-*बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान* 🔸 _डोळ्यादेखत उभं रान जळताना शेतकर्यांचं ह्रदय तळतळलं_

इमेज
  *बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान* 🔸 _डोळ्यादेखत उभं रान जळताना शेतकर्यांचं ह्रदय तळतळलं_  परळी वैजनाथ( प्रतिनिधी) : तालुक्यातील बोधेगाव येथील शेतात उभ्या असलेल्या उसाला अचानक आग लागली. या आगीत जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांचा पंधरा एकर ऊस जळून खाक झाला.या आगीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बोधेगाव येथे शुक्रवारी (दि.२१) दुपारी सोनहिवरा  रस्त्यावर तळ्याच्या लगत असलेल्या उसाला अचानक आग लागली.        आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली की, या आगीत जवळपास १५ एकर ऊस जाळून खाक झाला आहे. आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतात लागोपाठ शेजारी ऊस लागवड असल्याने एका शेतातील ऊसाला आग लागल्याने ती मोठ्या प्रमाणात पसरली.यामध्ये बबलू राजेभाऊ शिंदे, सुधाकर रामभाऊ शिंदे, दशरथ नारायण शिंदे, बाळासाहेब नारायण शिंदे, मुंजाभाऊ गुणाजी गडदे आदी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागताच गावकऱ्यांनी ती आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेतकऱ्यांना विझवणे शक्य...

MB NEWS-*आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्यातील स्थिती चिंता वाढवणारी ; एका दिवसात ५९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह*

इमेज
आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्यातील स्थिती चिंता वाढवणारी  ; एका दिवसात ५९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        दिवसेंदिवस वाढतच चाललेली कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या चिंताजनक बनली आहे.आजचा कोविड अहवाल आला. परळी तालुक्यातील स्थिती चिंता वाढवणारी असुन एका दिवसात ५९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत.         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ५९ आहे.आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या २९५ आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. 

MB NEWS- *राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू* *सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय*

इमेज
 *राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू* *सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय* *त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या नियमावलीला अनुसरून वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश* मुंबई (दि. 21) ---- : राज्यात सोमवार दि. 24 जानेवारी पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करावीत तसेच यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत. राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी कोविडची परिस्थिती आटोक्यात येत असून, सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये ...

MB NEWS- **पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा प्रशासनाचा केज तालुक्यात क्रीडा संकुल उभारणीस हिरवा कंदील*

इमेज
 **पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा प्रशासनाचा केज तालुक्यात क्रीडा संकुल उभारणीस हिरवा कंदील* *पिसेगाव येथील 4 हेक्टर 56 आर जमीन क्रीडा संकुलासाठी प्रशासनाने घेतली ताब्यात* बीड (दि. 18) ---- : केज तालुक्यात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असून तालुक्यातील मौजे पिसेगाव येथील गायरानातील सर्व्हे क्र. 100 मधील 4 हेक्टर 56 आर जमीन संपादित करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मनिषा मिसकर यांनी दिले आहेत.  जिल्हा क्रीडा विभाग, महसूल, वन विभाग, कृषी विभाग आदी सर्वांच्या समन्वयाने सदर जमीन क्रीडा विभागास उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले होते. यासाठी केज मतदारसंघातील विविध लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली होती. पिसेगावच्या हद्दीतील ही जमीन प्रशासनास क्रीडा संकुलासाठी उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिकांनीही आवश्यक ते सहकार्य केले. या जमिनीवर लवकरच भव्य क्रीडा संकुल उभारणीच्या काम...

MB NEWS-भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांसह इतरांची निर्दोष मुक्तता*

इमेज
 . भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांसह इतरांची निर्दोष मुक्तता* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     सन २०१३ मध्ये तत्कालीन भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी नामफलक लावण्यावरून भाजयुमो कार्यकर्ते व अॅटो चालक यांच्यात वाद झाला होता. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून अॅड.राहूल लेणेकर व इतर १४जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणात परळी न्यायालयाने अॅड.राहूल लेणेकर व इतर १४जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.          अॅड.राहूल लेणेकर व इतर १४ जणांवर परळी न्यायालयात  दोषारोपपत्र दाखल झाले.या प्रकरणी सुनावणी होऊन साक्षीपुरावे तपासण्यात आले.याप्रकरणात परळी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.निलेश येलमाने यांनी सर्व 15 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अॅड.प्रकाश मराठे, अॅड.प्रदीप गिराम यांनी काम पाहिले.त्यांना अॅड.राहुल सोळंके,अॅड.अश्विन साळवे, अॅड.प्रणव मराठे यांनी सहकार्य केले.

MB NEWS-*प्रा.एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र ज्येष्ठ, अनुभवी नेतृत्वाला मुकला* *पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

इमेज
  *प्रा.एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र ज्येष्ठ, अनुभवी नेतृत्वाला मुकला* *पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली *  मुंबई ॥ दिनांक १७ ॥ थोर विचारवंत, लढावू नेते प्रा.एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला मुकला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे की, प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने खूप जेष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला. चळवळीच्या संस्कारांचे ते भक्कम स्तंभ राहतील, त्यांच्याकडून येणारी पिढी भविष्यातही शिकत राहील असं ट्विट करत त्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. ••••