इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांसह इतरांची निर्दोष मुक्तता*

 . भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांसह इतरांची निर्दोष मुक्तता*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    सन २०१३ मध्ये तत्कालीन भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी नामफलक लावण्यावरून भाजयुमो कार्यकर्ते व अॅटो चालक यांच्यात वाद झाला होता. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून अॅड.राहूल लेणेकर व इतर १४जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणात परळी न्यायालयाने अॅड.राहूल लेणेकर व इतर १४जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

         अॅड.राहूल लेणेकर व इतर १४ जणांवर परळी न्यायालयात  दोषारोपपत्र दाखल झाले.या प्रकरणी सुनावणी होऊन साक्षीपुरावे तपासण्यात आले.याप्रकरणात परळी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.निलेश येलमाने यांनी सर्व 15 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अॅड.प्रकाश मराठे, अॅड.प्रदीप गिराम यांनी काम पाहिले.त्यांना अॅड.राहुल सोळंके,अॅड.अश्विन साळवे, अॅड.प्रणव मराठे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या