गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS- *बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*



*बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*

🔸 _डोळ्यादेखत उभं रान जळताना शेतकर्यांचं ह्रदय तळतळलं_ 


परळी वैजनाथ( प्रतिनिधी) : तालुक्यातील बोधेगाव येथील शेतात उभ्या असलेल्या उसाला अचानक आग लागली. या आगीत जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांचा पंधरा एकर ऊस जळून खाक झाला.या आगीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बोधेगाव येथे शुक्रवारी (दि.२१) दुपारी सोनहिवरा  रस्त्यावर तळ्याच्या लगत असलेल्या उसाला अचानक आग लागली. 

      आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली की, या आगीत जवळपास १५ एकर ऊस जाळून खाक झाला आहे. आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतात लागोपाठ शेजारी ऊस लागवड असल्याने एका शेतातील ऊसाला आग लागल्याने ती मोठ्या प्रमाणात पसरली.यामध्ये बबलू राजेभाऊ शिंदे, सुधाकर रामभाऊ शिंदे, दशरथ नारायण शिंदे, बाळासाहेब नारायण शिंदे, मुंजाभाऊ गुणाजी गडदे आदी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागताच गावकऱ्यांनी ती आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेतकऱ्यांना विझवणे शक्य झाले नाही. अग्निशमन दलाला संपर्क साधून माहिती दिली. मात्र शहरातून अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या