MB NEWS-सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र

सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती मुंडे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री आर.राजा स्वामी यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती मुंडे यांच्या 2021 मधील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याबद्दल व जिल्ह्यात कामाच्या बाबतीत १ नंबर ला पोलीस स्टेशन आणल्याबद्दल "प्रशस्तीपत्र "देऊन सन्मान केला आहे. बीड जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांमधुन क्रमांक १ चे पारितोषिक परळी ग्रामीण पोलीस ठाण्याला प्राप्त झाले आहे. भविष्यात अशाच प्रकारे कार्य करुन बीड जिल्हा पोलिस दलाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी व्यक्त केली आहे.या यशाबद्दलपरळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे....