MB NEWS-भरदिवसा-भरबाजारातून दहा लाखाचे दागिने केले लंपास ;चोरांचे सोन्यासह स्कुटी घेऊन पलायन
.jpeg)
भरदिवसा-भरबाजारातून दहा लाखाचे दागिने केले लंपास ;चोरांचे सोन्यासह स्कुटी घेऊन पलायन अंबाजोगाई ,एमबी न्युज वृत्तसेवा......... एका सराफा व्यावसायिकांनी स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेले दहा लाखाचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना भरदिवसा-भरबाजारात घडली आहे. अंबाजोगाई येथील सराफा व्यापार्याचे डिक्कीत ठेवलेल्या सोन्याच्या बॅगीसह भर चौकातून स्कुटी घेऊन मेवाड हॉटेलच्या पाठीमागच्या बोळीत स्कुटी नेऊन सोडली व डिग्गीतील दहा लाखाची दागिण्याची बॅग लंपास केली. शहरातील गुरूवार पेठ भागामध्ये राठौर ज्वेलर्सचे दुकान मालक राहुल राठौर हे सोमवारी सकाळी दहा वाजता घरातुन येवून आपले दुकानाचे शटरला लावलेले कुलूप उघडू लागले मात्र शटरच्या कुलपा मध्ये कोणीतरी फेविक्विक व खडे टाकलेचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कुलूप उघण्यासाठी शिवाजी चौकातील कूलपाची चावी बनवणाऱ्या कारागिराकडे धाव घेतली.आपली प्लेजर स्कुटी एमएच. ४४-एफ-४३१ क्रमांकाच्या डिग्गी मध्ये दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने त्याची किंमत ९ लाख, ९२ हजार २९३ डि...