पोस्ट्स

MB NEWS-पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

इमेज
  पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार  धारूर, प्रतिनिधी....        धारुर शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी धारुर पोलिसात  दोन आरोपी विरुध्द आज 16 फेब्रुवारी सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.          पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या  माहितीनूसार एका फोटो स्टुडिओत पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली असता यातील आरोपीने पासपोर्ट फोटो काढून त्या दिवशी न देता फिर्यादीला दुसर्‍यादिवशी  बोलावून घेऊन तिचे इच्छे विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले व ही गोष्ट कोणास सांगितल्यास मी तुझ्या भावाला खल्लास करेल अशी धमकी दिली.तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी व दोन्ही आरोपी हे एका दिवशी तिघेजण फोटो स्टुडिओ मध्ये गप्पा मारत बसले असता आरोपी क्रमांक एक हा फोटो काढण्याच्या कामासाठी बाहेर गेला. यावेळी  यातील आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी सोबत शारीरिक संबंध ठेवले व ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला गु.र.न.22/2022 न...

MB NEWS-धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी बसस्थानकाचे रुपडे बदलणार!

इमेज
  धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी बसस्थानकाचे रुपडे बदलणार!  *बसस्थानक बांधकाम व विकासाचा आराखडा अंतिम करण्यासाठी वास्तू विशारद, वरिष्ठ अधिकारी व स्वतः ना. मुंडे स्थळ पाहणी करून आराखड्यातील बदल सुचवणार* मुंबई (दि. 15) ---- : परळी शहर बस स्थानक बांधकाम व परिसराचा विकास करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून परिवहन विभागाने तयार केलेला आराखडा अंतिम करण्यापूर्वी त्यात बस स्थानकाचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी काही बदल करण्याचे सुचवले आहे.  हे बदल प्रत्यक्ष आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी परिवहन विभागाचे वास्तू विशारद, वरिष्ठ अधिकारी आदींना धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी पाचारण केले आहे. धनंजय मुंडे हे स्वतः त्यांच्यासोबत बस स्थानकात जाऊन त्यांना अपेक्षित असलेले बदल आराखड्यात सुचवणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरले आहे.  परळी शहर बसस्थानाकाचा सुधारित आराखडा आज मुंबई येथे ना. धनंजय मुंडे यांच्या समोर सादर करण्यात आला. यावेळी परिवहन विभागातील बांधकाम महाव्यवस्थापक भूषण देसाई, वाहतूक महाव्यवस्थापक, स्थापत्य कार...

MB NEWS-संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी व दार्शनिक दृष्टीचे संत होते- डॉ व्ही. जे. चव्हाण

इमेज
  संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी व दार्शनिक दृष्टीचे संत होते- डॉ व्ही. जे. चव्हाण         परळी, प्रतिनिधी - जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये संत सेवालाल महाराजांची 283 जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी डॉ.व्ही जे चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी  व दार्शनिक दृष्टीचे संत होते असे उद्गार याप्रसंगी व्यक्त केले. संत सेवालाल महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा  नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या काळी समाजाला भजनाची आवड हाेती. हे ओळखून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी व्ही मेश्राम यांनी संत सेवालाल  महाराज हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडले असे सांगितले. या समाजशास्त्र विभाग प्रमुख...

MB NEWS-परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई ४ लाखांचा गुटखा जप्त

इमेज
  परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई ४ लाखांचा गुटखा जप्त  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी शहरातील अमर ग्राउंडवरील एका किराणा दुकानावर काल सायंकाळी छापा मारला. यात ४ लाख ४० हजार ४६५ रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. तर तिघे  फरार झाले आहेत.        राज्यात गुटखाबंदी असताना बेकायदेशीररित्या किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला. दुकानातून विविध प्रकारचा ४ लाख ४० हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळे करत असल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.       

MB NEWS- 🔸 *भूतदया आणि मानवतेची शिकवण संत सेवालाल महाराज यांनी दिली- श्रीराम चव्हाण* • _कै.राजीव गांधी अनु. जाती जमाती निवासी आश्रमशाळा खडका येथे सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी_

इमेज
 🔸 *भूतदया आणि मानवतेची शिकवण संत सेवालाल महाराज यांनी दिली- श्रीराम चव्हाण*  • _कै.राजीव गांधी अनु. जाती जमाती निवासी आश्रमशाळा खडका येथे सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी_  सोनपेठ,प्रतिनिधी....     कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्था संचलित कै राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना शाळेचे सहशिक्षक श्रीराम चव्हाण यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज हे मानवतेची शिकवण देणारे संत होते. भूतदया आणि मानवता या त्यांच्या सद्गुणांचा आपण अंगीकार केला पाहिजे.          कै. राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृह अधीक्षक डी. एम. माने हे होते यावेळी शाळेचे शिक्षक एस. एम. राठोड, आर. बी. जोशी, डी. एल. भिसेगावकर, इ.एन.हरगिले, शुभम चाकोरे, मनेष चव्हाण, साहेब भालेराव, बाळासाहेब मोकाशे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते य...

MB NEWS-परळी तालुक्यातील जेष्ठ नेते गोपीनाथ पवार यांचे निधन

इमेज
  परळी तालुक्यातील जेष्ठ नेते गोपीनाथ पवार यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         गडदेवाडी येथील रहिवासी व सध्या सोनपेठ येथे वास्तव्य असलेले माजी सरपंच गडदेवाडी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे  संचालक व जिल्हा परिषदचे माजी सदस्य  गोपीनाथराव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ८३ वर्षे वयाचे होते.       गोपीनाथराव पवार हे  बळीराम पवार (निवृत आयुक्त), बापूराव पवार (अतिरिक्त जिल्हाधिकारी मुंबई) व किशनराव पवार ( पणन अधिकारी, मुंबई ) यांचे वडील होत. तसेच डॉ. कोंडीराम पवार व सिताराम पवार (निवृत उप पोलिस अधीक्षक) यांचे बंधू होत. त्यांच्यामागे ३ मूले, ४ मुली, २ भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून सोनखेड, सोनपेठ येथुन निघेल. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-चोरट्यांचा धुमाकूळ: २लाख ‌८६ हजाराची चोरी; नागरिकांमध्ये दहशत

इमेज
  चोरट्यांचा धुमाकूळ: २लाख ‌८६ हजाराची चोरी; नागरिकां मध्ये दहशत     परळी वैजनाथ/प्रतिनिधी......        दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी व अंबाजोगाई तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन चोरीची मोठी घटना बर्दापुर येथे दि.१२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.   या चोरीत २लाख ‌८६ हजार रोख रक्कम पळवली आहे.          सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. दि.१२ रोजी बर्दापुर येथे फिर्यादी बलभीम विश्वनाथ मोरे यांच्या  दुकानी चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे...