MB NEWS-मुख्याधिकारी यांच्या भेटीची आठवड्यात चार तास वेळ म्हणजे नागरिकांची चेष्टा-नितीन समशेट्टे

मुख्याधिकारी यांच्या भेटीची आठवड्यात चार तास वेळ म्हणजे नागरिकांची चेष्टा-नितीन समशेट्टे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. शहरातील नागरिक नगर परिषदेच्या अकार्यक्षम कामकाजामुळे आधीच त्रस्त आहेत त्यात नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातील फक्त 4 तास वेळ देण्याचा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचा आरोप भाजपाचे नितीन समशेट्टे यांनी केला आहे. सध्या नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यामुळे मुख्याधिकारीच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळीत आहेत. नवीन आलेल्या मुख्याधिकार्यांनी चार्ज घेतल्यानंतर शहरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी नागरिकांना भेटण्यासाठीच बंधने टाकली आहेत. आठवड्यातील फक्त सोमवार आणि मंगळवार याच दिवशी 4 त 6 याच वेळेत भेटावे असा निर्णय आपल्या कार्यालयाच्या बाहेर लावला आहे.ही नागरिकांची केलेली चेष्टाच आहे. हा आदेश त्वरित मागे घ्यावा व नागरिकांच्या समस्या दूर करून त्यांना सुविधा देण्यासाठी वेळ द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे नितीन समशेट्टे यांनी दिला आहे. •••••••••••••••••••...