पोस्ट्स

MB NEWS-विधान परिषद निवडणूक: भाजपाच विजेता !

इमेज
  विधान परिषद निवडणूक: भाजपाच विजेता !    राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत झाली. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली.  या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता लागलेली होती.  हे देखील आवश्य वाचा: 🔴 विश्व संगीत दिवस विशेष वृत्तकथा 🔵 सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम"_ विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. विधानसभेतील एक जागा रिक्त तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही. विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर झाला.यामध्ये भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.          हे देखील आवश्य वाचा: 🔵 आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष वृत्तकथा🔵 नौली, वामनौली, दक्षिणनौली या आवघड योग...

MB NEWS- आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष वृत्तकथा:नौली, वामनौली, दक्षिण नौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे

इमेज
  नौली, वामनौली, दक्षिण नौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे प रळी वैजनाथ:....          योगशास्त्र ही भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. योगशास्त्रातील क्रिया या सोप्या नसतात.मात्र योग्य मार्गदर्शन व नित्य सरावाने योगशास्त्रातही व्यक्ती पारंगत होऊ शकतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे परळी तालुक्यातील पांगरी (गोपीनाथगड) चे उपसरपंच असलेले अॅड.श्रीनिवास मुंडे हे आहेत.गेल्या अनेक वर्षापासून व्यायाम,योग प्राणायाम यामध्ये नित्य सरावाने पारंगत झालेले अॅड.श्रीनिवास मुंडे योगाच्या आवघडात आवघड क्रियाही अगदी सहजतेने करतात.नौली, वामनौली, दक्षिणनौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी' म्हणून परिचित होत आहेत.        वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट  हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फा...

MB NEWS-विश्व संगीत दिवस विशेष:सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम"

इमेज
  सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम" प रळी वैजनाथ:       काशी येथील संगीत गंगोत्री मराठवाड्यातील परळी सारख्या गावात आणून संगीतक्षेत्रातील जाज्वल्य कार्य उभे करणारे परळीतील प्रतिष्ठित चौधरी घराण्यातील पं. गणेशअण्णा चौधरी यांनी 70 वर्षांपूर्वी परळीतील पहिले शास्त्रीय संगीत केंद्र निर्माण केले. आजतागायत हा संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपला गेला आहे. त्यांनीच स्थापन केलेल्या भक्ताश्रमाच्या माध्यमातून अभिजात संगीताचा हा वारसा सदोदित निरपेक्ष भाव दर्शवतो. हे देखील आवश्य वाचा: 🔵 आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष वृत्तकथा🔵 नौली, वामनौली, दक्षिणनौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे       शास्त्रीय संगीत कलेला लोकाश्रय देऊन त्या परंपरेचे जतन करणाररा परळीतील सर्वपरिचित असा लौकिक असणाऱ्या भक्ताश्रमने गेल्या ७०वर्षात जुन्या-नव्या कलावंतांचा समन्वय, सादरीकरण, संगीत मैफलींचे दस्तऐवजीकरण आणि प्रशिक्षणाद्वारे संगीतसेवा सुरू ठेवली. अभिजात कलेचा वारसा जपणाऱ्या या भक्ताश्रमातून...

MB NEWS-सई कोल्हेचा स्नेही बचत गटाकडुन सत्कार

इमेज
  सई कोल्हेचा स्नेही बचत गटाकडुन सत्कार *परळी वै.ता.२० प्रतिनिधी*       परळी येथील सई वैजनाथराव कोल्हे या विद्यार्थीनीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ९९.२० टक्के गुण घेऊन विद्यावर्धीनी शाळेतुन प्रथम क्रमांकाने यश मिळविल्याबद्दल स्नेही बचत गटाकडुन सत्कार करण्यात आला. रविवारी (ता.१९) सायंकाळी सात वाजता शंकर पार्वती नगर येथील तिच्या निवासस्थानी जाऊन स्नेही बचत गटाचे सर्व सदस्यांनी सईचा फेटा बांधुन, पुष्पगुच्छ व पेढे देऊन  सत्कार केला. यात विशेष असे कि स्नेही बचत गटाचे सदस्य वैजनाथराव कोल्हे यांचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दुःखद निधन झाले. सईने वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत हे दैदिप्यमान  यश संपादन केले.  प्रतिकुल परिस्थितीत कठोर परिश्रम व अत्यंत जिद्दीने सातत्याने अभ्यास करून तिने हे यश प्राप्त केले. मिळविलेल्या यशाबद्दल स्नेही बचत गटाच्या वतीने तिचे कौतुक  करून सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेही बचत गटाचे अध्यक्ष दादाराव सुर्यवंशी, सचिव अशोक जाधव, पांडुरंग आलापुरे, प्रकाश चव्हाण, आबासाहेब शिंदे, शरद घनचेकर, रमेश देशमुख,ओम वरवटकर, पांडुरंग यादव, सुनिल फु...

MB NEWS-पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

इमेज
  पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            तालुक्यातील कनेरवाडी येथे शेतात पेरणी करून रासनीचे काम करणाऱ्या करणाऱ्या एका शेतकऱ्यावर अचानक काळाने घाला घातला आहे. आज दि.२० रोजी अंदाजे सायंकाळी 4.30 वा. सुमारास विजेचा कडकडाट झाला आणि अंगावर वीज कोसळून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.                 याबाबत माहिती अशी की, कनेरवाडी ता. परळी वैजनाथ येथील रहिवासी शेतकरी माणिक बाबुराव मुंडे वय 42 वर्षे हे  शेतात पेरणीचे काम करत होते. पेरणी झाल्यानंतर रासनीचे काम करत असताना अचानक वारा कावधान व विजांचा कडकडाट सुरु झाला. अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दुर्दैवाने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. महसूल प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करुन अहवाल सादर केला असल्याची माहिती तलाठी व्ही.एस.गित्ते यांनी दिली. 

MB NEWS-राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी प्रा. वर्षा दहीफळे

इमेज
  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी प्रा. वर्षा  दहीफळे परळी वैजनाथ ,प्रतिनिधी....        राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी येथील प्रा. वर्षा उमाकांत दहीफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत नियुक्तीचे पत्र नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.          राष्ट्रवादी युवती काँग्रेस हा युवतींसाठी देशातील पहिला राजकीय मंच असून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित ,बजरंग सोनवणे, जिल्हाध्यक्षा सौ. विद्या जाधव यांच्या मान्यतेने परळी शहराध्यक्ष म्हणून प्रा. वर्षा उमाकांत दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कार्यरत राहू असा विश्वास नवनियुक्त शहराध्यक्ष प्रा. वर्षा दहिफळे यांनी व्यक्त केला आहे.

MB NEWS-आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त आयोजित पाच दिवशिय योग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आयोजित पाच दिवशिय योग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद  परळी वैजनाथ:  आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त जिजामाता गार्डन हेल्थ क्लब परळी, पतंजली योग समिती परळी व वैद्यनाथ बँक परळी यांच्या संयुक्त विद्यमाने  21 जून रोजी योग दिन हा दिवस जिजामाता उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  या दिनाचे औचित्य साधून नागरिकांसाठी 5 दिवसाचे योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे     यावेळी  योग शिक्षिका सरला उपाध्याय आसना मध्ये स्थिरता व सुख म्हणजे आनंद प्राप्त होण्यासाठी आसना चे प्रशिक्षण सुयोग्य गुरू च्या मार्गदर्शनाखाली होणे आवश्यक आहे. हाच विचार करुन जिजामाता गार्डन हेल्थ क्लब परळी व पतंजली योग समिती परळी व वैद्यनाथ बँक परळी ने 5 दिवसाचे शिबिर विनामूल्य आयोजित केले आहे. या शिबिराचा कालावधी 17 जून ते 21 जून हा असून प्रशिक्षण दररोज सकाळी 7. 00 वाजता जिजामाता उद्यान होत आहे या शिबिराचे समारोप (21 जून) योग दिनाच्या दिवशी सकाळी 7.00  वाजता होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योगो...