MB NEWS -परळीत मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात अनागोंदी; वास्तविक सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे- जुगलकिशोर लोहिया

परळीत मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात अनागोंदी; वास्तविक सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे- जुगलकिशोर लोहिया परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷ येथील नगर परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर आला असून नगर परिषद च्या होउ घातलेल्या निवडणुकीतील मतदार यादीतही मोठे घोळ घातले असुन अनेकांची नावे गायब झाली आहेत तर अनेकांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेली आहेत तसेच कुटुंबातील मतदारामधेही फोड करण्यात आली आहे तसेच मतदार यादीतील पाने च गायब झाली आहेत यासंदर्भात मा.जिलहाधिकारी यांनी यासंदर्भात तातडीने लक्ष घालून मतदारांना त्याचाच प्रभागातील मतदार यादी मधे नाव समाविष्ट करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी ,मा.उपविभागीय अधिकारी ,मा.मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे. अंतिम प्रभाग रचना जाहिर झाल्या नंतर प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर प्रत्येक प्रभागात जाउन मतदारांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असताना सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून व त्या प्रभागातील सत्ताधारी का...