पोस्ट्स

MB NEWS-दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या 10वी परीक्षेत 100% यश

इमेज
  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या 10वी परीक्षेत 100% यश परळी (प्रतिनिधी) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसई तर्फे घेण्यात आलेल्या 2021-22 शैक्षणिक वर्ष इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकता जाहीर झाला असून त्यात दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत सर्वोत्तम गुण मिळवले आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर अंगद गुट्टे 94.08%, द्वितीय क्रमांक अभय विक्रम काळे 93.04%, तृतीय क्रमांक अजित कुमार लटपटे 91.04% गुण मिळवले आहे.   येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अजून चांगले यश मिळावे याकरिता सुटीच्या दिवशी सराव परिक्षा व शंका निवारण वर्ग, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पालक शिक्षकांची नियुक्ती, गणित विज्ञान विषयांसाठी अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती, निवडक पाठांसाठी ॲानलाईन तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचे निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतले आहेत.  विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे व पालकांचे शाळेच्या विवेकानंद युथ वेल्फेअर सोसा...

MB NEWS-परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व महात्माजींच्या पुतळ्याचे आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

इमेज
  परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व पुतळ्याचे आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते  लोकार्पण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- भाऊड्या कराड परळी (प्रतिनिधी): आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन साकारलेले व परळी शहराचे वैभव वाढविणारे विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यानाचे लोकार्पण व महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे अनावरण आज दि. 24 जुलै रोजी दुपारी 3.30 वा. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.  हे उद्यान निर्माण करण्यासाठी या भागाच्या नगरसेविका सौ. प्राजक्ता श्रीकृष्ण (भावड्या) कराड यांनी आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात व श्री. वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवक नेते भाऊड्या कराड यांनी केले आहे. परळी शहराच्या विद्यानगर भागात उभारण्यात आलेल्या या उद्यानात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 5 पंचाचार्यांचे प्रतीक म्हणून 5 भक्तीस्थाने, ध्यान साधना करण्यासाठी मेडिटेशन परिसर, वाचनालय, दुर्मिळ वृक्ष, यांसह वॉकिंग ट्रॅक आदी साकारण्यात आले असल्...

MB NEWS -20 लाख 72 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल: महाजनवाडी येथे चंदनचोरी; पंकज कुमावत मोठी कारवाई

इमेज
20 लाख 72 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त: महाजनवाडी येथे चंदनचोरी; पंकज कुमावत मोठी कारवाई बीड, प्रतिनिधी.... बीड तालुक्यातील महाजनवाडी शिवारात शेतातील चंदनाची झाडे तोडून नंतर त्यातील गाभा काढून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. 23 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली . या कारवाईत 499 किलो चंदनाची तासलेला गाभा , लाकडे वजन काटा वाकस व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त करून एकूण 10 आरोपी विरुद्ध नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . या कारवाईने चंदन चोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे .  महाजनवडी ( ता . बीड ) येथील एक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या काही इसमाच्या मदतीने शिवारातील शेतात चंदनाची झाडे चोरून तोडून आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभ विक्री करण्यासाठी घरात  ठेवला आहे , अशी माहिती सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी खातरजमा करत सदरची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना ...

MB NEWS-लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
  लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी परळी  वैजनाथ   ( प्रतिनिधी) लावणयाई  पब्लिक स्कूलमध्ये आज दिनांक 23 जुलै  रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक  कार्यकर्ते  अँड.अरुण  पाठक, प्रमुख पाहुणे म्हणून  कृष्णा विर्धे, शाळेचेअध्यक्ष अनंत  कुलकणी,  मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  हे उपस्थित  होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेतील श्लोक पारेगावकर,श्रेयस  हरेगावकर अरोही  पेंटेवार,अणर्व पवार, प्रज्वल घडवे या मुलांनी  लोकमान्य  टिळक यांच्यावर भाषण  केले.अध्यक्षीय  भाषणात अँड. अरुण  पाठक  यांनी टिळकांविषयी  मोलाचे  मार्गदर्शन  केले. यावेळी कृष्णा  विर्धे  यांनी  लोकमान्य टिळकांचे विचारासह स्वराज्य व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाद्वारे पटवून दिले ....

MB NEWS-शिवाजी पोळ यांची उपनिरीक्षकपदी निवड

इमेज
  शिवाजी पोळ यांची उपनिरीक्षकपदी निवड  परळी - येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नानाभाऊ पोळ यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.     गेल्या एक वर्षापासून परळी येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. ग्रामीण पोलीस स्टेशन येथील सत्कार प्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक खोडेवाड साहेब , गणेश यरडवार , सुनील अन्नमवार, रामचंद्र केकान, लक्ष्मण टोले , विनोद कदम, व्यंकट डोलणे, नामदेव चाटे, नवनाथ हरेगावकर , रमेश तोटेवाड तसेच महिला पोलीस कर्मचारी नेहा करवंदे, मायादेवी कांबळे , भाग्यश्री डाके, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-गौरव जगतकरचे सिबीएससीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश

इमेज
  गौरव जगतकरचे सिबीएससीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश  परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी)  गौरव विनोद जगतकर सिबीएससीच्या दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण घेवून शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.                गेल्या काही दिवसांपासून सिबीएससी बोर्ड दहावी, बारावी परिक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. समाजमाध्यमाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखा घोषित होत होत्या यामुळे विद्यार्थी वर्गात चिंता निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारी (ता.२२) सकाळी बारावी व दुपारी दोन वाजता दहावीचा निकाल लागला. येथील राजस्थानी पोद्दार स्कूल चा विद्यार्थी गौरव विनोद जगतकर याने सिबीएससी दहावी बोर्ड परिक्षेत ९५ टक्के गूण प्राप्त करुन शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. मुंडे  यांच्यासह प्राध्यापक, शिक्ष...

MB NEWS- चि.आदित्य भातंब्रेकरचे सीबीएसईत विशेष प्राविण्यासह सुयश

इमेज
 चि.आदित्य भातंब्रेकरचे सीबीएसईत विशेष प्राविण्यासह सुयश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         चि.आदित्य अनिरुद्ध भातंब्रेकर हा इंग्रजी माध्यम सीबीएसई बोर्ड इ. दहावी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण झाला आहे.त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.      चि.आदित्य हा पहिलीपासून पोतदार इंटरनॅशनल स्कूल औरंगाबाद  येथे शिकत असून नुकताच त्याचा सीबीएसई बोर्ड  दहावीचा निकाल आला. तो या परिक्षेत विशेष प्राविण्य  घेऊन उत्तीर्ण झाला आहे.आदित्य हा परळी वै. येथील माजी गटशिक्षणाधिकारी कै.श्री अशोकराव भातंब्रेकर यांचा नातू आहे. या घवघवीत यशाबद्दल मित्रमंडळी व सर्व नातेवाईक यांच्याकडून त्याचे कौतूक होत आहे.