MB NEWS-मुंबईचे महत्त्व सांगणारा अण्णाभाऊ साठेंचा ग्रंथ राज्यपालांनी वाचवा आणि पुन्हा महाराष्ट्राचा अवमान करू नये - अनंत इंगळे

मुंबईचे महत्त्व सांगणारा अण्णाभाऊ साठेंचा ग्रंथ राज्यपालांनी वाचवा आणि पुन्हा महाराष्ट्राचा अवमान करू नये - अनंत इंगळे परळी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना पोस्टाने पाठवला ग्रंथ परळी ( प्रतिनिधी) महाराष्ट्राचा सातत्याने अवमान करणाऱ्या राज्यपालांच करायचं काय खाली मुंडकं वर पाय राज्यपालांचा जाहीर निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व विशद करणारा ग्रंथ परळी पोस्ट कार्यालयातून पाठवला असून राज्यपालांनी तो वाचावा आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करू नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी मागील काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अवमान कारक वक्तव्य केले होते. पुन्हा चार दिवसापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये एका खाजगी कार्यक्रमात ब...