इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव प्रदीप देशमुख यांच्या हस्ते झाली श्रावण पर्वकाळ शुभारंभाची पारंपरिक महापूजा

 वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव प्रदीप देशमुख यांच्या हस्ते झाली श्रावण पर्वकाळ शुभारंभाची पारंपरिक महापूजा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

     बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या वर्षभरात विविध महापूजा होतात. देवस्थान ट्रस्टच्या वतीने या पूजा केल्या जातात. सध्या सुरू झालेल्या  श्रावण पर्व शुभारंभाचा रुद्राभिषेक देवस्थानचे सचिव प्रा. प्रदीप देशमुख यांच्या हस्ते शुक्रवार दि.२९ रोजी  करण्यात आला.

पहा video news:■ *परंपरा: श्रावण मासाच्या शुभारंभाला ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची अशी केली जाते महापूजा.* _MB NEWS |Subscribe |Like |Share |Comments_

     वैद्यनाथ मंदिर येथे वर्षभरात विविध उत्सव परंपरेने साजरे केले जातात. प्रत्येक उत्सवाला विशेष महत्त्व असते. प्रत्येक उत्सवाच्या वेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने परंपरेनुसार पूजा केली जाते. श्रावण मासाच्या प्रारंभीही ही पारंपारिक पूजा केली जाते. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव प्रदीप देशमुख व कुटुंबियांच्या शुभहस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रातील ब्रह्मवृंद व क्षेत्र उपाध्याय यांच्या मंत्रोच्चारणात हा पारंपारिक पूजा विधि अतिशय धार्मिक व उत्साहात पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या