दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-मुंबईचे महत्त्व सांगणारा अण्णाभाऊ साठेंचा ग्रंथ राज्यपालांनी वाचवा आणि पुन्हा महाराष्ट्राचा अवमान करू नये - अनंत इंगळे

 मुंबईचे महत्त्व सांगणारा अण्णाभाऊ साठेंचा ग्रंथ राज्यपालांनी वाचवा आणि पुन्हा महाराष्ट्राचा अवमान करू नये -  अनंत इंगळे



 परळी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना पोस्टाने पाठवला ग्रंथ


परळी ( प्रतिनिधी)

      महाराष्ट्राचा सातत्याने अवमान करणाऱ्या राज्यपालांच करायचं काय खाली मुंडकं वर पाय राज्यपालांचा जाहीर निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व विशद करणारा ग्रंथ परळी पोस्ट कार्यालयातून पाठवला असून राज्यपालांनी तो वाचावा आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करू नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी व्यक्त केली.

       महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी मागील काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अवमान कारक वक्तव्य केले होते. पुन्हा चार दिवसापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये एका खाजगी कार्यक्रमात बोलत असताना  मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

     राज्यपालांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा निवडक वाड्मय हा ग्रंथ परळी येथील पोस्ट कार्यालयामार्फत राज्यपालांना पाठवण्यात आला. त्यापूर्वी कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोशयारी यांच्या विरोधात आणि निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी प्रतिक्रिया देताना अनंत इंगळे म्हणाले की राज्यपाल भगतसिंग कोशयारी सातत्याने महाराष्ट्राचा अवमान करत आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी पुन्हा करू नये यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईचे महत्त्व विशद केलेले साहित्य वाचावे यासाठी हा ग्रंथ त्यांना पाठवण्यात आला आहे.

     या आंदोलनात     शिक्षण सभापती गोपाळराव आंधळे,सरचिटणीस अनंत इंगळे, महादेव रोडे,अल्ताफ पठाण, सय्यद सिराज, लालाखान पठाण,केशव गायकवाड, संजय देवकर, केडी उपाडे, संजय देवकर, अमर रोडे,गफार काकर, धम्मा अवचारे, पवन फुटके,दिपक कुरील,शरद कावरे,भैयासाहेब जाधवर, अमर सुर्यवंशी शेख शारेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....