इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन*

 *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन*




परळी वैजनाथ ता.०१ (प्रतिनिधी)

        येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.



              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ.लक्ष्मण मुंडे,प्रा.डॉ. जगतकर, प्रा.डॉ. नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये देविका बदाले, सरोज बनसोडे, आदि विद्यार्थ्यांसह प्रा.डॉ जगतकर, प्रा.नेरकर,प्राचार्य डॉ मुंडे यांनी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठेंच्या यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय समारोप प्रा.प्रसाद देशमुख यांनी केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.फुटके, सूत्रसंचालन आरती डाके, व नंदिनी जाधव यांनी तर आभार श्रावणी साबणे हिने मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या