MB NEWS-परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये 12 ऑगस्ट रोजी नाथ प्रतिष्ठाण कडून तिरंगा वितरण व तिरंगा रॅलीचे आयोजन* *सकाळी 9 वा. गणेशपार येथून निघणार रॅली*

* परळीतील प्रभाग क्र. 5 व 16 मध्ये 12 ऑगस्ट रोजी नाथ प्रतिष्ठाण कडून तिरंगा वितरण व तिरंगा रॅलीचे आयोजन* *सकाळी 9 वा. गणेशपार येथून निघणार रॅली* परळी (दि. 10) - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत 10 हजार तिरंगा ध्वजांचे वितरण करून 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असून, यांतर्गत दि. 12 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 5 व 16 मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता गणेशपार येथुन या भव्य तिरंगा रॅलीस सुरुवात होणार असून, ही रॅली गणेशपार, धनगर गल्ली, देशमुख गल्ली, जगतकार गल्ली, प्रबुद्ध नगर, इस्लामपूरा बंगला, हनुमान नगर, नादुरवेस, अंबेबेस, भोईगल्ली आदी मार्गानी जाणार आहे. देशाभिमान व आपल्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण इतिहासास अभिवादन करण्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त सर्व देशप्रेमी नागरिकांनी तसेच दोनही प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भ...