पोस्ट्स

MB NEWS-अजय अतुल गोपीनाथ गडावर

इमेज
  अजय अतुल  गोपीनाथ गडावर अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक-संगीतकार अजय-अतुल यांनी परळी येथे धनंजय मुंडे यांच्या निमंत्रणानुसार नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त आले असता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन स्व. मुंडे साहेबांना अभिवादन केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याबद्दल अजय व अतुल गोगावले यांना माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

MB NEWS-*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी २हजार ३९१ स्पर्धकाची नोंदणी*

इमेज
  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी २हजार ३९१ स्पर्धकाची नोंदणी *पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे घरोघरी जाऊन करणार देखावा, सजावटीची पाहणी* _तज्ज्ञ महिला परिक्षकांची टीम  स्पर्धा परिक्षणासाठी सज्ज_ परळी । दिनांक ०३। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि द टर्निंग पॉईंट यांच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी सुमारे दोन  हजार ३९१ स्पर्धकांची विक्रमी नोंदणी झाली आहे. येत्या सोमवारी ५ तारखेला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे स्पर्धकांच्या घरोघरी जाऊन देखाव्याची पाहणी करणार आहेत.  तज्ज्ञ महिला परिक्षकांच्या देखरेखीत स्पर्धेचे परीक्षण होणार आहे.     शहरातील स्थानिक कलाकार व गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हया स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या पण यंदा कोरोनाचे सावट दूर झाले आणि सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने हया स्पर्धा देखील मोठया उत्साहाने पार पडत आहे...

MB NEWS -धर्मापुरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीमेचे आयोजन

इमेज
  धर्मापुरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीमेचे आयोजन  धर्मापुरी । प्रतिनिधी धर्मापुरी येथील प्राचीन भुईकोट किल्ला व केदारेश्वर मंदिर येथे  दि.४ सप्टेंबर रोजी दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्ग संवर्धन कार्यासाठी देशभरात कार्यरत असलेल्या राजा शिवछत्रपती परिवार व बा रायगड परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेत किल्ल्याच्या तटबंदीवरील गवत, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेलेले अवशेष काढणे, प्लास्टिक कचरा गोळा करणे इत्यादी कामे आणि पुरातन वस्तू व वास्तू जतन करण्यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे.  बा रायगड परिवार, राजा शिवछत्रपती परिवार बीड व लातूर विभाग, इतिहास संकलन समिती आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनसह नागरिक या मोहिमेस उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेत इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन राजा शिवछत्रपती परिवार व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे करण्यात आले आहे.

MB NEWS: गोपाळ आंधळे यांचा विशेष लेख:विघ्नहर्ता श्री.गणेशाचे जन्मस्थान प्रभाकर क्षेञ म्हणजेच आजचे परळी वैद्यनाथ!

इमेज
  विघ्नहर्ता श्री.गणेशाचे जन्मस्थान प्रभाकर क्षेञ म्हणजेच आजचे परळी वैद्यनाथ! -----------‐---------------------- ✍️ विशेष लेख:गोपाळ आंधळे,परळी वै.  -----------‐---------------            सर्व विद्यांचा अधिपती म्हणजे श्री गणेश भगवान ते समूळ सृष्टी चे विघ्नहर्ता आहेत. बुध्दिची देवता म्हणून सर्व देवतांनी आणि ऋषीमूनींनी गणरायांना प्रथम स्थान दिले आहे. कुठलेही कार्यसिध्दी करण्यासाठी प्रथम श्री गणेशाची आराधना करावी लागते. असे धर्मशास्ञ सांगते. अशा या विघ्नहर्त्या गणेशांची जन्म भूमी ही दुसरी तिसरी कोठे नसून वैवस्वत मन्वंतरात ज्या तिर्थक्षेत्रात प्रभाकर क्षेञ म्हणून उल्लेख येतो ते तिर्थक्षेत्र म्हणजेच  आजचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र हेच होय.       भगवान श्री गणेशाची जन्म कथा पुराणात अशी आलेली आहे की,एकदा ब्रम्हदेव अत्यंत क्रोधित असतांना त्यांचा संबंध महाजृभेशी झाला. त्यातून एक अपत्य जन्मास आले. तो दिसायला खूप सुंदर होता. त्याचा वर्ण शेंदराप्रमाणे लाल असल्यामुळे त्यास सिंदूर म्हणून संबोधले जाऊ लागले. ब्रम्हदेवाने या...

MB NEWS-जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर:परळीतील दोघांचा समावेश

इमेज
  जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर: परळीतील दोघांचा समावेश बीड – जिल्हा परिषदेच्या वतीने यावर्षी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.जिल्ह्यातून अकरा प्राथमिक, दहा माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा गौरव करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषदेने यावर्षी सीईओ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारासाठी निवड समिती गठीत केली होती.या समितीने जिल्ह्यातील अर्ज केलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर जिल्ह्यातून या बावीस शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे.यामध्ये सय्यद हशमोद्दीन अंबाजोगाई,लाड गोरक्षनाथ आष्टी,उशाबाई ढेरे बीड,गणेश नरके धारूर,भगवान फुंदे गेवराई,धम्मदीपा दरबारे केज,पाचनकर सुनंदा माजलगाव,सौदागर कांदे परळी,अण्णासाहेब खंडागळे पाटोदा,सुभाष सांगळे शिरूर,सुवर्ण सुतार वडवणी यांना प्राथमिक विभागातून तर संजय तांदळे अंबाजोगाई,संजय कोळी आष्टी,रवींद्र देवगावकर बीड,चांदबा वाघमारे धारूर,विष्णू साळुंके गेवराई,रामकृष्ण भारती केज,बाळासाहेब सोनसळे माजलगाव,पठाण इमरान परळी,विजयकुमार साळुंके पाटोदा,राम वाघूम्बरे शिरूर यांना माध्यमिक विभागातून तसेच अमोल...

MB NEWS-बनावट सोने देऊन केली 14 लाखाची फसवणूक; सराफा व्यापाऱ्याला गंडा

इमेज
  बनावट सोने देऊन केली 14 लाखाची फसवणूक;  सराफा व्यापाऱ्याला गंडा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      सिरसाळा येथील एका सराफा व्यापाऱ्याला सोन्या चांदीची खरेदी विक्री करून विश्वासात घेऊन बनावट सोन्याची नाणी देऊन चौदा लाख रुपयाला गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत.          याबाबत सिरसाळा पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक  24 6 2022  रोजी शिवम ज्वेलर्स सिरसाळा येथे फिर्यादी समाधान अशोकराव उबाळे रा. वाघाळा यांच्या सोन्या-चांदीच्या दुकानी आरोपी रामसिंग डांगुर रा. वांगी ता. माजलगाव व अन्य दोन अनोळखी इसम आले. फिर्यादीच्या शिवम ज्वेलर्स या दुकानी जाऊन सोन्या चांदीची खरेदी विक्री करून विश्वास संपादन करून सराफा व्यापाऱ्याला पंधरा नाणी ज्याचे वजन 298 ग्रॅम सोन्याची आहेत म्हणून दिली. फिर्यादीकडे त्याची विक्री करून फिर्यादी कडून 14 लाख रुपये घेऊन निघून गेले. फिर्यादीने या नाण्याची खात्री करण्यासाठी सोन्याचे ना...

MB NEWS-'न्यूज मेकर' भाजपा नेत्या पंकजा मुंडे बनल्या 'न्यूज अ‍ॅंकर'

इमेज
'न्यूज मेकर' भाजपा नेत्या पंकजा मुंडे बनल्या 'न्यूज अ‍ॅंकर' मुंबई, 1 सप्टेंबर :  भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज अँकरच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. यानिमित्ताने पंकजा मुंडेंमधील विविध कलांची जनतेला ओळख झाली. न्यूज मेकर पंकजा मुंडेनी आज पत्रकारांना प्रश्न विचारले. आणि पत्रकारांनीही खुलेपणाने त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. आज ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन सुरू आहे. यादरम्यान पंकजा मुंडेंनी पुणे आणि मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या बस बाई बसच्या मंचावर दिसल्या होत्या. यावेळीही त्यांनी खुलेपणाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. याशिवाय झी मराठीच्या उंच माझा झोका या कार्यक्रमातही त्या दिसून आल्या होत्या. यावेळी त्यांनी सूत्रसंचालन केलं. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे अशा विविध प्लॅटफॉर्मवर सक्रिय झाल्याच्या दिसून येत आहे.