पोस्ट्स

MB NEWS-सिरसाळ्यात ट्रक चोरी तर परळीत घरफोडीची घटना

इमेज
  सिरसाळ्यात ट्रक चोरी तर परळीत घरफोडीची घटना परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...  परळी शहर व तालुक्यात चोरीचे सत्र अखंडितपणाने सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. वाढत्या चोऱ्या हा नागरिकांच्या चिंतेचा विषय बनलेला आहे. सिरसाळा येथे ट्रकचोरीची तर परळी शहरात घरफोडीची घटना नोंद झाली आहे.        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, सिरसाळा जवळील एका पेट्रोल पंपा समोर लावलेली फिर्यादी वाजेखान सादत खान पठाण या वीट भट्टी व्यवसायिकाची लाल भगव्या रंगाची जुनी वापरती ट्रक कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.या ट्रकची अंदाजे किंमत दोन लाख वीस हजार आहे .याप्रकरणी सिरसाळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोह शेंगळे हे करत आहेत. तर दुसरी घटना परळी शहरात घडली असून फिर्यादी शांताबाई केशवराव वाघमारे राहणार हबीबपुरा यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दाराची कडी व कुलूप तोडण्याचा प्रयत्न करून घराचे पत्रे उचकवून आत प्रवेश केला व घरातील सोन्याचे लॉकेट कानातील झुंबर जोड नगदी असा एकूण 73 रुपयाचा मु...

MB NEWS-माजलगाव धरणातील बेपत्ता डाॕ.दत्ता फपाळ यांचा मृतदेह सापडला

इमेज
  माजलगाव धरणातील बेपत्ता डाॕ.दत्ता फपाळ यांचा मृतदेह सापडला धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली.         धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. काल सकाळपासून विविध शोध पथका मार्फत त्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात होता यादरम्यान शोध घेणाऱ्या पथकातील एका जवानाचाही मृत्यू झालेला आहे आज सायंकाळी 5:45 च्या दरम्यान शोधपथकाला डॉक्टर कपाळ यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.      स्थानिक मच्छीमारांचे शोधमोहीमेत मोठे योगदान  माजलगाव धरणावर दररोज मिञा सोबत पोहण्यासाठी जात आसालेल्या डाॕ.दत्ता फपाळ हे रविवारी धरणावर पोहण्यासाठी गेले आसताना.धरणाच्या पाञात लांब गेल्याने तीथुन परत येण्याच्या आत त्यांना दम लागल्याने ते घाबरुन पाण्यात ...

MB NEWS-माजलगाव धरणात बुडालेल्या शोध पथकातील जवानाचा बुडून मृत्यू;मृतदेह सापडला

इमेज
   माजलगाव धरणात बुडालेल्या शोध पथकातील जवानाचा बुडून मृत्यू;मृतदेह सापडला माजलगाव............     माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डाॕ.फपाळ यांना शोधण्यासाठी कोल्हापुर येथील जवान ही  पाण्यात बेपत्ता झाला होता. एनडीआरएफ च्या या जवानाचा तळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून शोध पथकाने सर्च ऑपरेशन करून हे दोन्ही मतादेह शोधण्याचा प्रयत्न केला असता या जवानाचा मृतदेह  सापडला आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे स्वतः घटनास्थळी तळ ठोकून आहेत.          धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली. संबंधित बातमी : माजलगाव धरणात डॉक्टर बुडाला धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात ...

MB NEWS-धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या पथकातील जवान पाण्यात बेपत्ता

इमेज
  धक्कादायक: माजलगाव धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या पथकातील जवान पाण्यात बेपत्ता     माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डाॕ.फपाळ यांना शोधण्यासाठी कोल्हापुर येथील जवान ही यात पाण्यात बेपत्ता झाला आहे.         धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली. संबंधित बातमी : माजलगाव धरणात डॉक्टर बुडाला धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत अद्याप सापडलेले नाही.    डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी, येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टिमने शोधकार्य सुरू केले. मात्र धर...

MB NEWS-लावण्याई पब्लिक स्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

इमेज
 * इंग्रजी माधयामातुन शिका पण भारतीय संस्कृती जपा- डाॅ सुरेश चौधरी भविष्यात  हीच मुले  शाळेचे  नाव उज्ज्वल  करतील-प्रा. डाॅ.  जगतकर   लावण्याई  पब्लिक स्कूल मध्ये  मराठवाडा  मुक्ती  संग्राम  दिन  उत्साहात  साजरा परळी वैजनाथ  (प्रतिनिधी )  17 सप्टेंबर या मराठवाडा  मुक्ती  संग्राम  दिन  लावण्याई पब्लिक स्कूल  मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना डाॅ चौधरी   म्हणाले  की, मुलांना ईंग्रजी माध्यमातुन  शिकवा पण हे शिक्षण घेत असतांना आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे असे मत या वेळी बोलतांना व्यक्त केले तर प्रा. डाॅ  विनोद  जगतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून  लावण्याई  पब्लिक  स्कुल  मधील  मुले  भविष्यात  मोठे  होवुन  शाळेचे  नाव उज्वल  करतील असा विश्वास असल्याचे प्रा डॉ  जगतकर  यांनी बोलताना व्यक्त  केले         लावण्याई पब्लिक स्कूल मध्ये मराठवाडा मुक...

MB NEWS-पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा तळ्यात बुडून मृत्यू

इमेज
  पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा तळ्यात बुडून मृत्यू धारूर..... धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली. धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत सापडत नसुन बीड येथील पथक घटनास्थळी येत असल्याची माहिती आहे. डॉ. फपाळ हे यांचा तेलगाव येथे दवाखाना असून तेलगाव परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

MB NEWS- दुहेरी संकट: शेतकरी चिंताग्रस्त

इमेज
  भाव वाढण्याची वाट बघणार्‍या शेतकऱ्यांच्या घरातच सोयाबीनला  लागल्या अळ्या ; शेतकरी हवालदिल   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         गेल्या वर्षीचे सोयाबीन मोठ्या प्रमाणावर साठा झालेले आहे. आज ना उद्या भाव मिळेल या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी अडचणींचा सामना करत या सोयाबीनची साठवणूक करून ठेवली मात्र यावर्षीचे सोयाबीन निघण्याची वेळ आली तरी सोयाबीनला अपेक्षित भाव काही आला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल बनला असून आता शेतकऱ्यांच्या घरी असलेले सोयाबीन जागेवरच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर साठा असलेल्या सोयाबीनला जागेवरच अळ्या लावायला सुरुवात झाली आहे.त्यामुळे कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्याशिवाय आता शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही.          गेल्या वर्षी सुरुवातीला सोयाबीनला चांगला भाव होता. त्यानंतर सोयाबीनचे भाव घसरले. गेल्या सहा महिन्यापासून सोयाबीनचे भाव घसरलेलेच राहिले. बाजारपेठेत सोयाबीनला उठाव नसल्याने सोयाबीनच्या किमती वाढल्या नाही. आज ना उद्या अपेक्षित भाव वाढेल याची वाट बघणारा शेतकरी आता मात्र हातचेही गेले आणि ...